भ्रष्ट दारुड्या अधिकार्याची सुटका, रस्त्यावरील लोकांना दंडूका
औरंगाबाद (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना रोगाचे निर्मूल करणेसाठी लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन करा, असा शासनाचा फतवा, त्यात रस्त्यावरील लोकांना कोठे चाललास म्हणून पोलीस दंडूका हिच कायदा व सुव्यवस्था आणि भ्रष्ट व दारुड्या अधिकार्याला मात्र गंभीर गुन्हा असताना ही, त्याची राजरोष पणे विनाविलंब सुटका कशी काय होवू शकते, ही न्याय प्रणाली आहे काय, अशीच उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामभाऊ गीते हे कोरोना रोगाचे निर्मूल करणे ऐवजी शासकीय गाडीने त्यांच्या गावी जात होते. त्यांच्यागाडीत दारुसह पाकीट खर्च म्हणून एक दोन हजार रुपये नव्हे, तर चक्क सहा लाख सत्तर हजार रुपयाची नगदी रोकड मिळून आली. व रक्कमेसह गाडी जप्त करुन जालना जिल्ह्यातील बदनापुर पोलीसानी डॉ. गीते यांचेवर खटला दाखल करुन त्याना सोडून दिले. दारु व रोख रक्कम का व कशी बाळगली हा गंभीर गुन्हा असताना ही त्यास अधिकारी म्हणून सर्वकांही माफ आणि रस्त्यावरुन घराकडे किंवा बजारात जाणार्या व्यक्तीस दंडूक्याने मारहान करुन त्याचेवर खटला भरला जातो. आणि त्यास सरकारी कोंडवाड्यात डांबविने ही प्रशासकीय यंत्रणेचे पोलीस खात्याचे अजब कृतीवृत्तीची चवीने चर्चा होत असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामभाउ गीते यांना अवैद्य विनापरवाना दारु बाळगने, अवैद्य भ्रष्ट मार्गाची रक्कम वसुल करून ती जवळ बाळगने, आणि कोरोनाग्रस्त कोविड बाधीत रुग्णावर उपचार करणे ऐवजी घरी जाणे या संदर्भात खटला दाखल करुन कायमस्वरुपी सेवामुक्त करावे अशी मागणी जोर धरताना दिसत आहे. यामुळे भ्रष्ट दारुड्या अधिकार्याची सुटका आणि रस्त्यावरील लोकांना दंडूका असे कसे काय घडू शकते, अशीच उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे.