कोरोना निर्मूलना ऐवजी भाजपाला फेसबुक महत्वाचे

कोरोना निर्मूलना ऐवजी भाजपाला फेसबुक महत्वाचे 


नागपूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोविड १९ या विषारी संसर्गजन्य रोगाने देशाला हैराण केले आहे.  वैद्यकीय तज्ञ डॉक्टर युध्द पातळीवर कोरोनाग्रस्त व कोरोना बाधीत रुग्णावर उपचार करीत आहेत.  तर राज्य शासन व प्रशासन आणि पोलीस यंत्रणा लॉकडाउनच्या माध्यमातून कोविड विषाणूचा फैलाव होवू नये म्हणून डोळ्यात तेल घालून दक्ष आहेत.  पण कोरोना निर्मूलना ऐवजी केवळ प्रसिध्दीसाठी हापापलेले सर्वपक्षीय नेते मात्र फेसबुकवरुन जाहिरातीच्या मार्गाने केवळ प्रसिध्दीसाठी बातम्या पसरवून कोरोना निर्मूलनाच्या लढाईत अडसर निर्माण करु पाहत आहेत.  अशीच चर्चा राजकीय वर्तूळात व्यक्त होताना दिसते आहे. 
संकटकाळी संकटग्रस्ताना मदत करणे, हे नागरीक तसेच लोकपप्रतिनिधीचे आद्यकर्तव्यच असते पण.. केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वेगवेगळी माहिती सुचना देवून दिशाभूल करणार्‍या बातम्या फेसबुकवर जाहिरातीपोली देवून राजकीय हेतू साध्य करण्यात महाराष्ट्रात भाजपा अग्रेसर दिसतो आहे.  नागपूरस्थित रेशीम बागेतून सुरु झालेल्या फेसबुकचा प्रसार पश्‍चिम बंगाल पर्यत गेला.  आणि फेसबुकवर वेगवेगळ्या बातम्या देणार्‍या पंश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देशात अव्वल स्थानी असल्याचा निर्वाळा फेसबुकच्या ऍड लायब्ररी रिपोर्ट ने दिला आहे.  
 राज्यातील विविध राजकीय पक्ष नेत्यासह भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी सुनिल देवधर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, भाजपा नेते आर के सिन्हा यांनी लाखो रुपये खर्च करुन फेसबुकवर जाहिरातवजा बातम्या देवून राजकीय हेतूने प्रसिध्दी मिळवून घेतली असून महाराष्ट्राला जर्जरकरुन सोडलेल्या कोरोना कोविड विषारी रोगा बाबतीत मात्र भाजपा नेते गंभीर नसावेत अशीच उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या