लॉकआउट कशाला लॉकडाउन म्हणा
मुंबई (दै.लातूर प्रभात प्र.) ः देशभरातील लॉकडाउन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनंतर संपनार असल्याने आपापल्या गांवी जाण्यासाठी हजारो कामगार मुंबईतील वांद्रे रेल्वेस्थानकावर जमले. आणि भव्य मोठा समुदाय जमा झाल्याने पोलीसांची भंम्बेरी उडाली. परिस्थिती निवळली पण कोणीतरी रेल्वे सुटणार असल्याचे पिल्लू सोडल्याने हा प्रकार घडल्याचे स्पष्ट करुन कोरोना कोविडचा प्रतिकार करुन त्या रोगाचे निर्मूलन करणेसाठी लॉकडाउन केले आहे. लॉकआउट नाही असा निर्वाळा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अचानक उसळलेल्या गर्दीचे निराकारण केले.
कोविड १९ हा संसर्गजन्य रोग असल्याने समुहाने लोक एकमेकाच्या संपर्कात येवू नयेत त्यातून रोगाचा प्रसार होतो. तो रोग अटोक्यात यावा व विषारी रोगाचा इतरानां संसर्ग होवू नये, कठोर असा टाळेबंदीचा निर्णय घेवून संरक्षीत केले. पंरतू चुकीच्या अफवेमूळे लोक घराबाहेर पडले, पंरतू अनर्थ घडला नाही. पोलीसानी कार्यकुशलतेने लॉकआउट हाताळले, असे स्पष्ट करुन अफवावर विश्वास ठेवता टाळेबंदीचे पालन करावे असे अहवान ही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. आणि लॉकआउट कशाला लॉकडाउन म्हणा अशी ही समज दिली.
विशेष म्हणजे आपापल्या राजकीय पक्षाचे ओळखपत्र बाजूला ठेवून कोविड विरोधी लढाई सहभागी झाले आहे. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी ही सोबत आहेतच. कालच केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांना बोललोय, राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार तर सुरवातीपासूनच सोबतीला आहेतच, सोनिया गांधी यांचे मनोमन सहकार्य आहे. त्या महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीवर लक्ष केंद्रित करुन असल्याने कोरोना हटाव मोहीम यशस्वी होवून महाराष्ट्रासह सारा भारत कोरोना मुक्त होणारच असा आशावादही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.