गरीबानां पाच दहा किलो तांदूळ तर इतरानां हवे तेवढे तांदूळ वाटप कसे ?
लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः गोरगरीब जनतेला, कामगार मजूरांना दारिद्रय रेषेखालील लोकासह गरजूना आजघडीला केंद्र शासना तर्फे प्रत्येकी पाच किलो तांदूळ त्या त्या भागातील स्वस्त धान्य दुकानदारा मार्फत मोफत वाटप होत असल्याचे जाहिर आहे. तसे लोकही सांगतात.
पंरतू लोकामध्ये अशी चर्चा आहे की, गोरगरीबांना शिधापत्रिकेनुसार केवळ पाच दहा किलो तांदूळ देवून परतावता. पंरतू इतरानां मात्र ओळखीनुसार हवे तेवढे तांदूळ दुकानदाराकडून दिले जातात. अशी चर्चा निरक्षर असलेल्या महिला पुरषातून होताना दिसते आहे.
मोफत धान्य वाटप असल्याने शिधा पत्रिका धारक गोरगरीब मजूर जनता सकाळपासूनच दुकाना समोर रांगा लावून उभे असतात. सामाजीक अंतराचे बंधन असल्यामूळे अनेकजन दिवसभर थांबून असतात. त्याना एका शिधा पत्रिके मागे पाच दहा किलो तांदूळ मिळतात.
पंरतू इतरांना अधिकचे तांदूळ मिळतात. घरात खाणारी पाच दहा तोंडे असताना महिनाभर पाच दहा किलो तांदूळात कसे जगावे, लॉकडाउनमूळे हाताला काम नाही, अशी खंत कामगार मजूरात होत असून युनिट प्रमाणे तांदूळ देणे गरजेचे असताना फाटक्या अवस्थेला पाहून कमी तांदूळ आणि चांगल्यानां नियमापेक्षा जास्त तांदूळ असा भेदभाव कशासाठी अशीच खंत व्यक्त करुन गोरगरीब कामगार मजूर जनता मजबुरीने मरण येत नाही, आणि जगणे सोडत नाही, अशीच द्विधा मनस्थीती समोर असल्याने सरकारी बाबू व त्या त्या भागातील नगरसेवक किंवा कार्यकर्ते गरीबाना न्याय देतील काय अशीच मागणी लोकातून होताना दिसते आहे.