कोविडची भिती गरीबापेक्षा श्रीमंतानाच

संपादकीय...


कोविडची भिती गरीबापेक्षा श्रीमंतानाच 


कोरोना कोवीड या संसर्गजन्य विषारी विषाणू रोगाचे पृथ्वीतळावरील माणसासह प्राण्यानाही गंजडून सोडले आहे.  माणसं तर आपणास हा रोग कधी घेरतो आणी बाधक व्यक्ती जगते की मरते या बातमीकडेच लक्ष देवून राहील्याचे चित्र दिसते आहे.  देशभरात लॉकडाउन आहे.  त्यामूळे आजघडीला सर्वकांही सामसूम आहे.  टाळेबंदीमुळे लोक बाहेर ये-जा करीत नाहीत.  नाममात्र गरजू वस्तूसाठी एक-दोन लोक बाजारात दिसतात.  कांही हौसी लोकही कांही तरी निमित्ताने बाहेर पडतात पण पोलीसी खाक्याच्या धास्तीने लागलीच घर जवळ करताना दिसतात.  यातूनच लॉकडाउनचे स्वतःहोवून लोक काटेकोरपणे पालन करीत आहेत हे निर्विवाद सत्य नाकारता येत नाही.  कारण शत्रूशी लढताना भारतीय लष्करी जवान मरणाला भित नाही, त्याच प्रमाणे महाकाय मृत्यूचा तांडव घेवून आलेल्या कोरोना रेगाचा पाडाव करण्यासाठी भारतीय नागरीक शासनाने आदेश पाळून स्वतःला कोंडवून घेवून कोरोनालाच हद्दपार करण्यासाठी धडपड करीत असताना दिसत आहेत.  अशा नागरीकाचे मनोधैर्यच वैद्यकीय अधिकारी, स्थानीक जिल्हाप्रशासन आणी पोलीस यंत्रणेला प्रेरणा देत असावे म्हणूनच डॉक्टर, पोलीस, जिल्हा प्रशासन रुग्णाची तत्पर सेवा करीत असल्याची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. 
 कोरोना कोवीड १९ च्या विषारी जंतूने मानवी शरीरात प्रवेश केला की त्या व्यक्तीस मृत्यूशिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही, हे अमेरिका, इटाली येथील कोरोना बाधीत मृतांच्या संख्येवरुन लक्षात येते पण जानेवारीच्या प्रारंभच्या काळात मुंबई-पुणे येथे एक एक प्रवासी कोरोना रोग घेवून परदेशातून मुंबईत आला आणी हा महाभंयकर अशा रोगाने भारतभर पसारा पसरिवला पंरतू मुंबई-पुणे येथील वैद्यकीय तज्ञ डॉक्टरानी वेळीच सावध होवून कोरोनास पाबंदी फैलाव होण्यास अटकाव केला आणी इतर देशापेक्षा भारत हा सावधगीरी बाळगल्यानेच रोगापासून स्थिर आहे असे वाटत असले तरी कोवीड १९ या विषारी विषाणूचा फैलाव होत आहेच.  युध्द पातळीवर डॉक्टर व त्याचे कर्मचारी सामना करुन रुग्णाना घरी पाठवित आहे.  तरी ही लॉकडाउन मध्ये डॉक्टराचे अर्धे काम केंद्र व राज्य सरकारे करीत असल्याने जनतेपेक्षा कोरोनाचे जंतूच सैरभैर झाले असावेत म्हणूनच कोविडचा शिरकाव होत नाही अशी भोळीभाबडी चर्चाही आमजनतेतून होताना दिसत असली तरी लॉकडाउन संपत आला असला तरी त्याचा कार्यकाळ वाढणार असल्याच्या वृत्तपत्रीय बातम्या आणी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या टीप्पणीतील शक्यता यामूळे गरज तिथेच लॉकडाउन करावे अन्यथा नको अशीच लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे.  ती रास्तच असावी अशी चर्चा सर्वसामान्य जनतेतून होताना ऐकवण्यात येते आहे.  पंरतू कोरोना या प्राणघातकी रोगाची भिती हीच त्याच्या फैलावास कारणीभूत असावी असा हा अंदाज व्यक्त होताना दिसतो आहे. 
 कारण साधारणपणे नेहमीप्रमाणे ताप-सर्दी झाली किंवा खोकला लागला की कोरोनाच झाला म्हणून नागरीक दवाखाना गाठत आहेत आणी कोरोनाची साथ-लागण होत असल्याने डॉक्टर तपासणी करुन त्या रुग्णास निगेटीव्ह म्हणून घरी पाठवित असल्याने नको ती धास्ती नागरीकानी घेतल्याने वैद्यकीय तज्ञ डॉक्टर वर्गास त्रास सहन करावा लागतो आहे.  अशी ही चर्चा रुग्णालय परिसरात होताना दिसते आहे.  कोरोना ग्रस्त रुग्णाची संख्या, संशयीत रुग्णाची संख्या, मृताची संख्या, वृत्तपत्रातून व दुरचित्रवाणीवरुन जाहिर होत असल्याने जनतेच्या काळजीत जास्तीची भर पडत असली तरी स्थानीक प्रशासन, वैद्यकीय क्षेत्राकडून अशा रुग्ण संख्या किवा मृताचा आकडा जाहिर न करता रुग्णावर उपचार करणे, लॉकडाउनचे पालन करवून घेणे व प्रतिकात्म्क बंधन म्हणून जनतेने टाळेबंदीचे पालन करणे, मास्क वापरणे, नेहमीसाठी हातपाय, तोंड धूवणे, सनीटायझरच वापर करणे याबाबीच वारंवार, वेळोवेळी जनतेत रुजवाव्यात हाच कोरोना विरोधी लढाईसाठी पर्याय ठरु शकतो अशी ही चर्चा शहरी व ग्रामीण भागातील साक्षर जनतेतून होताना दिसते आहे यासाठी जनजागृती, मार्गदर्शनाद्वारेच अर्धे उपचार कोरोनाग्रस्तावसह इतरावर होउ शकतात यात संदेह नसावा त्यातच स्थानीक जिल्हा प्रशासना प्रमाणे पेालीस यंत्रणेनेही सामंजस्याने जनतेवर लक्ष केंद्रीत करुन लॉकडाउनचे पालन करणेसाठी जनतेसह परावृत्त करावे केवळ सुंदरी हाच त्यावरचा उपाय नाही माणूसकी मानवी मुल्ये जोपासूनच यातून मार्ग निघू शकतो याकडे लक्ष देवूनच कोरोनाचा निपटारा करावा लागेल अशी ही लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे. 
 वास्तविक पाहता खरी धास्ती गरीबा पेक्षा श्रीमंतानाच जास्तीची असावी असे दिसते. गोरगरीब, कामगार, मजूर हे कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी स्वतःसह शासनाच्या आदेशामुळे टाळेबंदीत आहेत.  पंरतू श्रीमंत लोक, व्यापारी, भांडवलदार, कारखानदार, लोकप्रतिनिधी हे नाविलाजाने लॉकडाउन मध्ये अडकलेत.  श्रीमंताना, व्यापारी, भांडवलदाराना, कारखानदाराना अर्थसंपदा म्हणजे धन, पैसा कमविणेसाठी आपापला व्यवसाय करावा लागतो तो कामगार, मजूर, गरीब लोकाच्या कष्टातूनच हात असतो मजूर, कामगार नसेल तर त्यांचे उद्योग, व्यवसाय, काय कामाचे आहेत हे वास्तव नाकारु शकत नाही असे असले तरी आमच्या महसूलातून सरकार चालत असते ही भावनाही हे उत्पादक लपवू शकत नाहीत हे वास्तव आहे.  त्यातच लोकप्रतिनिधी लोककल्याण, जनतेचा विकास त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी न्यायीक मार्गाने जनसेवा करुन वेगवेगळ्या मार्गाने शासकीय निधी खर्च करुन पारदर्शक कारभार, प्रामाणीक सेवा जनतेला देत असतात.  त्यात विषारी कोरोना रेागाने त्यानांही जखडून ठेवल्याने त्यांचेही हात पांढरेच दिसत असल्याने लोकप्रतिनिधी असताना घरात कोंडून मग हाताला खाज कशी सुटणार म्हणून कोरोना हटाव मोहिमेत ते हिरारीने भाग घेवून शासन व वैद्यकीय क्षेत्राला मदत करीत असल्याचे चित्र दिसत असून गोरगरिब जनता, कामगार, मजूर मात्र नेहमीच शेतमालक, व्यवसायीक, कारखानदार, गुत्तेदाराच्या तावडीत लॉकडाउन व्हावे लागते.  आज सरकारी आदेशाने टाळेबंदीत आहोत, जगण्याची अस, ना मरणाची भिती यामुळेच अशा प्राणघातक रोगाला गरीब, कामगार, मजूर भिती बाळगत नाही तर भिती आहे ती श्रीमंतानाच.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या