पत्रकारासह जिल्हाधिकारी यांचा राज्यमंत्री यांच्याकडून अवमान ?
उदगीर (लातूर प्रभात प्र.) ः उदगीर येथे राज्य संजय बनसोडे यांची कोरोना रोग व कोरोनाग्रस्त रुग्णासंदर्भात आढावा बैठक आणि शिवभोजन योजनेचा शुभांरभ असे दोन शासकीय कार्यक्रम आयोजीत करण्यात आले होते. त्यासाठी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत होणार्या या कार्यक्रमासाठी राज्यमंत्री बनसोडे यांनी उदगीर येथील पत्रकाराना निमंत्रीत केले होते. शिवभोजन योजनेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर तेथील सभागृहात राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या उपस्थित आढावा बैठक सुरु होताच राज्य मंत्री यांनी आमंत्रीत केल्याने पत्रकारांनी बैठकस्थानी हजेरी लावली. पण जिल्हाधिकारी यांनी पत्रकाराना बैठकीत बसणेसाठी मज्जाव करुन बाहेर जाण्यासाठी संागीतले. जात नसाल तर मला बाहेर काढावे लागेल, असे पत्रकारा संदर्भात राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या समक्ष अनुद्गार काढून पत्रकाराचा अवमान केला, पण शासकीय कार्यक्रमासाठी पत्रकाराना मीच पाचारण केले आहे, असे राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांना सांगून त्यांचा गैरसमज दूर करणे गरजेचे असताना ही राज्यमंत्री बनसोडे यांनी तसे न केल्याने उदगीर परिसरात उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे.वास्तविक पाहता, शासकीय आढावा बैठकीस राज्यमंत्री बनसोडे यांनी पत्रकाराना निमंत्रीत करणे योग्य नव्हते. तरी ही निमंत्रीत केल्याने जिल्हाधिकारी यांच्या पत्रकारा संबधी वर्तनाला अक्षप घेवून पत्रकारांची बाजू घेणे गरजेचे होते. पंरतू बनसोडे यांनी तसे काही केले नसल्याने आश्चर्यचकीत अशी चर्चा होताना दिसते आहे.
जिल्हाधिकारी लातूर यांनी पत्रकाराचा अवमान केल्याने सभागृहाबाहेर पत्रकारांनी ठिय्या मांडून झाल्याकृतिचा निषेध करुन घोषणाबाजी केली, त्यावेळी पत्रकारासमोर येवून राज्य मंत्री बनसोडे यांनी झाल्याप्रकारा बद्दल माफी मागून दिलगीरी व्यक्त केली. पंरतू शासकीय आढावा बैठकी दरम्यान राज्यमंत्री यांच्या समक्ष जिल्हाधिकारी यांचा पत्रकाराकडून निषेध आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांच्याकडून पत्रकाराचा अवमान या दोन्ही कारणास राज्य मंत्री बनसोडे हेच कारणीभूत असावेत अशीच चर्चा होत असून पत्रकार व जिल्हाधिकारी यांच्यात मदभेद निर्माण होण्यासाठी राज्य मंत्री बनसोडे हेच कारणीभूत असून जिल्हाधिकारी यांचे अधिकार मोठे की राज्य मंत्री बनसोडे यांचे अधिकार मोठे हेच राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कळत नसल्यानेमुळे पत्रकार आणि जिल्हाधिकारी यांच्यात तणाव निर्माण झाला. आणि मतभेदाला कारणीभूत ठरलेले संजय बनसोडे यांच्याकडेच झाल्याप्रकाराचे निर्देश स्पष्ट झाल्याने उदगीरसह जिल्हाभरात उटलसूटच चर्चेला उधाण आल्याचे चित्र दिसते आहे.