जिल्हाधिकारी जी श्रीकांतजी आजघडीला आपण लयभारी ! पण ...?
लातूर (लातूर प्रभात प्र.) ः कोरोनाचे देभरात दहशत पसरविली आहे. महाराष्ट्राला कोवीड १९ ने महाराष्ट्राला भिरुड लावले आहे. लातूर जिल्ह्यात संशयीत असले तरी निलंग्यातील घडल्याप्रकाराने डाग लागला असला तरी लातूर जिल्हा कोरोणा बाधीत नाही ते केवळ जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या धाडसी, कर्तव्यतत्पर कृती-वृत्ती आणि अचूक मार्गदर्शन वेळीच सावधगीरी यामूळेच लॉकडाउन असले तरी जनता समाधानी आहे अशी चर्चा लातूर शहरासह जिल्हाभरात होताना दिसते आहे.
पंरतू जिल्हाधिकारी म्हणून दिलेले लॉकडाउनचे आदेशाने एका तरुणास वडीलांच्या अंत्यविधीलाही मूकावे लागले. यातून कायद्याच्या बडग्यामूळे माणूसकीही हरविली गेली की काय अशीच चर्चा उदगीर परिसरात होताना दिसते आहे. कारण असे की, लॉकडाउन आणि सिमाबंदी असल्याने उदगीर येथे राहाणारा नितीन कुलकर्णी याच्या वडीलाचे सेवानिवृत शिक्षक अनंतराव कुलकर्णी यांचे निधन झाले त्याच्या अंतविधीस नितीन कुलकर्णी निघाला पण उदगीर सिमेवरच त्यास अडवून पोलीसानी सिमाबंदीचा बडगा दाखविला आणि नितीन वडिलाच्या अंत्यदर्शनास मुकला. असे अनेक प्रकार घडल्याची चर्चा नेहमीच होते पण मरणाला भिणारे लोक इतराच्या मृत्यूचे कारण संागून इतरत्र जाउच शकत नाहीत याचे भान कायदेरक्षकाना असणे गरजेचे असावे. त्यातूनच माणूसकीचे दर्शन घडेल अशी चर्चा सर्वत्र होत असून जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्यामूळे लातूर जिल्हा कोरोनामुक्त असताना लयभारी कारभार असा व्यत्यय कसा काय असा प्रश्न अधोरेखीत होताना दिसतो आहे.