संपादकीय...
कोरोनावर इच्छाशक्तीचाही पर्याय
कोवीड १९ च्या विषारी महामारीने तमाम भारतीय नागरीकावर नैराश्यचे मलम पसरले दिसते आहे. जगण्यावरच बेतलेल्या या कोरोनाचा प्रतिकार, त्यातील विषारी जंतूचा नायनाट त्यावरील उपाययोजना या संबंधी देशभरातील डॉक्टर व वैद्यकीय तज्ञ त्यांचे सहकारी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना ग्रस्त रुग्ण व बाधीत रुगणावर उपचार करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नाना यश लाभत आहे. संशयीत रुग्णाची संख्या वाढते आहे पण कोवीड १९ या विषारी जंतूची ज्याना लागण झाली आहे असे कोरोनाबाधीत रुग्णाची संख्या कमी होताना दिसते आहे. अनेक बाधीत रुग्ण दुरुस्त होवून घरी जात आहेत. म्हणून भयावह अशा कोरोना रोगाची धास्ती घेवून नागरीकानी घाबरु नये तर उमेदीने आयूष्याकडे नव्याने पाहण्याची संधी उपलब्ध झाल्याने त्या संधीचा अनुनय करुन कोरोना रोगाचा प्रतिकार करुन त्याचे निर्मूलन करावे उपचारासाठी डॉक्टर आणी शासकीय यंत्रणा सज्ज व तत्पर असल्याने भिती कशाची असे धारिष्ट्ये दाखवून केंद्र व राज्य सरकारच्या संदेश व आवाहनाला साथ देणे गरजेचे आहे असे वाटते.
जनतेने लॉकडाउन स्विकारलेले आहे ते स्वतःच्या रक्षणासाठी, जगण्यासाठीच असे असताना कोरोना आला रे आला म्हणून मृत्यूला जवळ करण्याचे कांहीच कारण नाही, सार्या जगाला कोरोनाने मृत्यूच्या दरीत ओढले आहे. पंरतू भारतात कोवीड १९ ला शिरकाव करणेसाठी मार्गच उरला नाही, वेळीच देशभरातील डॉक्टरानी उपलब्ध औषधीवर विषारी जंतूचा नाश केल्याने आहे त्या परिस्थितीतलाच कोरोना आहे. त्यात वाढ नाही म्हणूनच कोरोनापासून मनस्वी कृतीवृत्तीतून दुर राहूनच बुध्दाने सांगीतल्याप्रमाणे स्वंय प्रकाशीत होवूनच अंधार करु पाहणार्या कोरोनाचा मूकाबला करणे हीच खरी काळाची गरज आहे असे वाटते. कारण प्रत्येकाला रोगाची भिती वाटतेच ते वास्तवही नाकारता येत नाही. भारतीय नागरीकाना तर रोगापासून ते परकीयाकडून घडविलेल्या युध्दाचाही अनुभव आहे. त्यामूळे पुर्वी जे हावळ येणे, गड्डे येणे असे रोग होते त्यातलाच हा नवा रोग समजून त्याचा प्रतिकार करणे गरजेचे असून तशी शक्ती भारतीय नागरीकात आहे. यात संदेह नाही, नसावा असे वाटते.
देशभरात कोरोना पसरल्यामूळे परिस्थिती गंभीर बनली आहे. वेगवेगळ्या संशोधानातून औषधी निर्मिती करुन उपलब्ध औषधी साठा तपासणी यंत्रे सामुग्रीच्या आधारावर निदान लागते आहे. उपचार सुरु आहेत, कोरोना बाधीत रुग्ण आहे की नाही यासाठी दवाखान्यासमोर रांगा लागत आहेत. त्या काबूत ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. कोरोना कोवीड १९ हा विषारी जंतूचा रोग हा संसर्ग जन्य रोग असल्याने संशयीत रुग्णाना काबूत ठेवून तपासणी करणारी यंत्रणा, डॉक्टराना त्रास होवू नये कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहावा, लोक समूहाने एकत्रीत असू नयेत फिरु नयेत आणी संचारबंदी टाळेबंदी, काळात नागरीकानी बाहेर येवू नये रोगाचा विषारी जंतूचा फैलाव होवू नये यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत असल्याने आणी जनताही साथ देत असल्यामूळे कोरोना इतरत्र पसरत नाही. त्यातच देशभरातील स्थानीक जिल्हा प्रशासनही नागरीकांच्या हालचाली, वाढती रुग्ण संख्या, कोरोना बाधीत रुग्ण, इतराना संसर्ग होवू नये यासाठीची खबरदारी घेवून संशयीत बाधीत रुग्णासह जनतेच्या सेवेसाठी तत्पर कार्यरत असल्यामूळे महाराष्ट्रासह देशभरात बाधीत रुग्णाची व मृत रुग्णाची इतर देशापेक्षा संख्या कमी आहे. यातच नागरीकाडून होणारे लॉकडाउनचे पालन, डॉक्टर त्याचे कर्मचारी व जिल्हा प्रशासनाचा तत्पर सेवा याचे हे फलीत आहे यात संदेह नाही.
कोरोनाचा शिरकाव अफवाचे पिक त्याला लागण झाली, तो मेला, या वार्तावरुन संयम बाळगणे, कोरोना प्रतिकारासाठी जिद्द व धाडस दाखविणे आणी विशेष म्हणजे रोग भयानक असो की मृत्यूचे तांडव माजविणारा असो त्या रोगावर मात करुन मी जगणार आहे. उद्याचे जगणे अनुभवणार आहे अशी ठोस, ठाम इच्छाशक्ती प्रत्येक नागरीकात असेल किंवा आणी जोपासली तरी मरण येणार नाही मग असल्या या कोरोना कोवीड विषारी रोगाचे काय घेवून बसलात अशी भावना संशयीत रुग्ण किंवा बाधीत रुग्णाना बोलून दाखविली तर उपचाराचीही गरज भासणार नाही एवढी इच्छाशक्तीत ताकद आहे याची खात्री बाळगूनच आमजनतेने कोरोना विरुध्दच्या लढाईत झोकून द्यावे असे वाटते यात दुमत नसावे एवढेच.