जिल्हाधिकारी जी श्रीकांत याच्या धसक्याने रस्ते सामसूम
लातूर (लातूर प्रभात प्र.) ः कोरोना विषत्तरी रोगाचे संशयीत रुग्ण संख्या जास्तीची असली तरी एकही रुग्ण बाधीत नव्हता पंरतू निलंगा येथे हरियानातून आंध्रात जाणारे कोवीड १९ चे रुग्ण सापडल्याने शासकीय यंत्रणेला धक्का बसला आणी कार्यात कसूर केलेले व निलंग्यात आश्रय देणारे वगैरे लोकावर खटले दाखल केल्याने लातूरच्या जनतेने धास्तावून दोन दिवसापासून रस्त्यावर येणे जाणे, चौका, चौकात आले तरी गरजू वस्तू घेवून लागलीच घर जवळ करीत असल्याने रस्ते सामसूम होत आहेत तर पोलीसांची धावपळही कमी झाल्याचे चित्र दिसते आहे. तरी ही पोलीसाची गस्त आणी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांची तत्पर सेवा, नकळत शहरी भागात, रस्त्यावरुन फेरफटका यामूळे स्वतःहोवून लॉकडाउनचे कठोर पालन करीत असल्याचे दिसते आहे.
मनपाची नावालाच वॉर रुम, नावालाच फवारणी
जीवघेण्या कोरोना संसर्ग रोगाचा प्रतिकार करणेसाठी लातूर महानगर पालीकेने मनपा कार्यालयात वॉररुम कक्ष स्थापन केला असून यातून कसा व कोणत्या रोगाचा निपटारा होतो आहे ते महापौरानाच माहित असावे असे बोलले जात आहे.
काल लातूरात जंतूनाशक फवारणी करण्यात आली ती ही नावालाच असावी. फवारणी कोठे व कशासाठी होते आहे हे नागरीकानाही कळत नव्हते त्यावेळी दैनिक लातूर प्रभातच्या प्रतिनिधीने रस्त्याच्या कडेवरील गवतावर फवारणी करा म्हटले तर तिथं नाही रस्त्यावरच आहे म्हणून साहेबाना सांगा असे उत्तर फवारणी कर्मचार्याने दिले. त्यावेळी त्या साहेबाना बोलताच अरे त्या गवतावर फवारणी करा म्हणताच फवारणी करण्यात आली. कोरोनाचे जंतू पसरु नये म्हणून फवारणी की पांढरे कागद काळे, निळे करावे म्हणून वॉररुम आहे, अशीच उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे.