त्या दानशुराकडे पैसा आला कोठून

त्या दानशुराकडे पैसा आला कोठून 



लातूर (लातूर प्रभात प्र.) ः लातूर शहर हे सामाजीक, राजकीय, सांस्कृतीक चळवळीसह शैक्षणीक व उद्योग व्यापारात अग्रेसर असे नामांकीत शहर आहे. लातूरात सामाजीक राजकीय क्षेत्र हे गंभीर व खंबीर स्वरुपाचे न्यायीक चळवळीचे केंद्र आहे.  अशा या लातूरात कोरोनाग्रस्त आणी विधवा गरीब महिलासह मजूर, कामगार व गरजूना अन्न धान्य पुरवठा करण्यासाठी कांही हौसी सामाजीक राजकीय कार्यकर्ते, गुत्तेदार, नगरसेवक पुढे येताना दिसत आहेत. गरजूना मोफत अन्न धान्य वाटपासाठी पैसा आला कोठून आणि पैसा असेल तर वाटपासाठी गरजू लोकांना आस दाखवून वाटपाविना लोक कशासाठी जमवीत आहेत, अन्न धान्य वाटप करणे, दुरच राहिले, पंरतू जमावाने लोक येत असल्यामूळे त्यातून लॉकडाउनचे उलंघन होत नाही काय, आणि विषारी कोवीड १९ चा फैलाव होत नाही का, अशी उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे.  कोणी दानशुरव्यक्ती अन्न धान्य वाटप करु इच्छित असेल तर ते अन्न धान्य तहसीलदार यांच्याकडे जमा करावे लागते, तशी माहिती जिल्हाधिकारी यांना द्यावी लागते, पण तसे होताना दिसत नाही, केवळ आगामी राजकीय हितापोटी नागरीकांना बोलवून अन्न धान्य वाटपाची ग्वाही देवून त्यांची दिशाभूल करण्यात येत आहे की काय, अशी ही चर्चा होताना दिसते आहे. 
 जो कोणी दानशुरव्यक्ती मोफत अन्न धान्य वाटप करु पाहतोय तो विना परवानाच की काय अशी ही चर्चा होत असून शासकीय अधिकार्‍यांची परवानगी न घेता, जनतेला आपलेसे करण्यासाठी अवैद्य मार्गाने जमा केलेला पैसा पांढरा करण्यासाठी तर ही धडपड असावी अशी चर्चा होताना दिसते आहे.  अशातच अन्न धान्य वाटप करण्या मागचा हेतू काय असावा याची खातरजमा करुन गरजूंची फसवणूक होत असल्याबाबतची चौकशी करणे गरजेचे असून अशा कृती वृत्तीवर आळा घालावा अशी मागणी होताना दिसते आहे. 
 कारण सरकारी पुरवठा विभागात हे अन्नधान्य जमा न करता आणि अनाधिकृतपणे वाटपही न करता जनतेची दिशाभूल कशासाठी कोणाच्या संागण्यावरुन हौसी लोक असे अनैतिक प्रकार घडवीत आहेत, अशा लोकावर कडक कारवाई करुन कठोर शासन करावे अशी ही मागणी लोक समूदयातून पुढे येताना दिसते आहे. 
 विशेष म्हणजे धान्य वाटपाच्या नावाखाली आशेपोटी लोक जमा होत आहेत, कोणी तरी चारपाच लोकाना पिशवी देवून पसार होतोय, बाकी लोक आपणाशी मिळेल म्हणून तेथेच जमावाने थांबतात त्यामूळे विषारी कोरोनाचा फैलाव होणार नाही कशावरुन आणि कोरोना बाधीत लोक होणार नाहीत काय, याला कारणीभूत कोण याची चौकशी शासनाने अशा या दगाबाज लोकाना पाबंदी करुन त्यांना कठोर शिक्षा करावी अशी ही मागणी जोर धरताना दिसते आहे. 
 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या