कोरोनाच्या विषारी विषाणू झडपेतही समाज माध्यमाचा आदर्शवत सेतू
नागपूर (लातूर प्रभात प्र.) ः प्राणघातकी भयावह अशा कोरोना रोगाने महाराष्ट्रासह नागपूर शहरालाही भयभीत करुन सोडले असून संशयीत रुग्णाची रोजच वाढ होत असताना दिसत असली तरी कोरोनाबाधकाची संख्या कमीच आहे तरी ही कोवीड १९ चा पाडाव करणेसाठी शासकीय यंत्रणा, सेवाभावी संस्था, पेालीस यंत्रणा ही गुंतली असल्याने गोरगरीब, मजूर, कामगार, कष्टकरी, व इतर रुग्णाची हेळसांड होत असल्याची कूणकूण समाज माध्यमातील तरुणाना लागली आणी त्या तरुणानी देशव्यापी समाज माध्यमाच्या माध्यमातून एक ग्रुप तयार करुन मदतीचा सेतू उभा करुन गरजूना आधार दिल्याने नागपूर येथील तरुणाच्या कार्याची सर्वत्र समाधानकारक चर्चा होताना दिसते आहे.
या समाजमाध्यमाच्या कार्यरत गु्रपमध्ये तरुण डॉक्टर्स, इंजिनिअर्स प्राध्यापक, पत्रकार, वकील, सामाजीक कार्यकर्त्याचा सहभाग असून कोरोनाच्या विषारी रोगामूळे धास्तावलेल्याना धीर देणे, गरजूना औषधी पुरविणे, उपचारासाठी दवाखान्यात दाखल करणे, वैद्यकीय सल्ला देणे, भुकेलेल्याना अन्नपूरवठा करणे, कामगार, मजूराना अन्न धान्य पुरविणे अशी सेवाभावी काम सुरु केले असून या आदर्शवत उपक्रमासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले असून नागपूरमधील नगरसेवकही मदत करीत असल्याची माहिती या ग्रुपचे डॉ. अभीक घोष यानी सांगीतले.
एकीकडे समाज माध्यमावर चोहीकडून संशय घेवून टीका होत असतानाच नागपूर मधील समाज माध्यमातील तरुणानी कार्यरत सेवेसाठी सेतू उभा करुन गरजूच्या गरजा पुरविण्याचे काम सुरु केल्याने सर्वत्र कौतूक होताना दिसते आहे.