उदगीरसह लातूर जिल्ह्यात अवैद्य दारु विक्री तेजीत
पोलीस यंत्रणा अंधारात कशी
उदगीर (लातूर प्रभात प्र.) ः जिल्ह्यातील लातूर नंतर उदगीर शहर हे शैक्षणीक व्यापारी दृष्टिने नावाजलेले शहर आहे. पण याच उदगीर शहरात पोलीसाच्या उपस्थितीत दारु मालकाच्या मदतीने अवैद्य दारु विक्री करीत असतील तर कोरोना रोगाच्या धास्तीने लॉकडाउन असताना ही, त्याचा भंग पोलीसच करीत असतील तर फिर्याद कोणाकडे करावी असाच प्रश्न उपस्थित झाला आहे. उदगीर देगलूर रस्त्यावरील मंगलकार्यालयाच्या डाव्या बाजूला शंभरफुट अंतरावर देगलूरकडे जाणार्या रस्त्यावर पत्र्याचे शड असलेल्या धाब्यावर पोलीसाच्या सहकार्याने अवैद्य दारु विक्री करीत असल्याचे एका नागरीकास दिसते आणि त्या गृहस्थाने पोलीस उपविभागीय अधिकारी जवळकर यांना फोनवरुन माहिती दिली, त्यावर कारवाई केली की नाही, हे गुलदस्त्यात असले तरी तो गर्दीपाहून पोलीस वाहन चार पाच कि.मी. पुढे जावून परत आली. कारण पोलीस गाडीत बॉक्स असल्याची चर्चा लोकात होताना दिसत होती. लोकांची गर्दी, पोलीस वाहन उपस्थिती मध्ये दारुचे बॉक्स अशा परिस्थितीत पितंळ उघडे पडते की काय म्हणून चोरी झाली, दारु पळवीली,शिल्लक दारु जप्त केली, असा कांगावा पोलीसानी केला असावा पण चोरी रात्रीची तपास सकाळी असावा, पण सायंकाळी कसे काय, जप्त दारु ठाण्यात जमा केली का, अशी चर्चा लोकात होताना दिसत होती. घडत असलेल्या स्थितीचे एकग्रस्त फोटो घेत असताना त्यास हटकले, पण पोलीसानी दाद दिली नाही, आणि पोलीस वाहनसह पसार झाल्याने पोलीसच अवैद्य दारु विक्रीला सहकार्य करुन कोरोना रोगाला हद्दपार करण्यासाठी लॉकडाउन जारी केले त्याचे उलंघन ही पोलीसच करीत असतील तर दाद कोणाकडे मागायची अशीच चर्चा होताना दिसते आहे. यावर पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकारी काय कारवाई करतील याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.
अशीच परिस्थिती जिल्हाभरात असून लातूर शहरातील कांही भागात अवैद्य दारु विक्रीने कहर केला असून चढ्या भावात दारु विक्री होत असली तरी तळीराम गर्दीकरुन किंवा शासनाच्या सामाजीक अंतराचे नियमपाळून दारु विकत घेवून आपली हौस भागविताना दिसतात. कारण कोरोनाग्रस्त नागरीकांना आणि इत्तराना बाधा होवू नये यासाठी पोलीस गुंतले असल्यामूळे हीच नामी संधी साधून दारु विक्री करणार्याचे चांगभले आणि पिणार्याचे दिवाळे अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसते आहे.