संपादकीय...
कोरोना शिकवतोय जीवन मुल्ये !
जीवन हे पाणी आहे. पाण्यावरचा बुडबूडा आहे अशी एक कहावत आहे. जीवनच आपल्याला मिळत असलेल्या वेळेचा कसा सदुपयोग करावा हेच शिकवत असते तर येणारा आणी आलेला काळ हाच आपल्याला जीवनाचे मुल्ये काय, कोणती किती आणि महत्वाची असतात त्याची शिकवण देत असतो. म्हणूनच आजघडीला कोरोना कोवीड १९ या विषारी संसर्ग जन्य जंतूच्या रोगातून मूक्त होण्यासाठी व पूढील आयूष्य जीवन जगण्यासाठी आटापीटा करीत आहोत याचे भान संचारबंदी, टाळेबंदीतून आपणास येत असावे अशी विचित्र, भयावह असे दिवस भोगण्यास नाममात्र कोवीड १९ नामक रोगाने तमाम भारतीयाना मजबूर केलेले आहे. हा परिणाम कोणताही भारतीय नागरीक नाकारु शकत नाही.
वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नसतो वेळ आणी काळ या नैसर्गीक बाबी असल्यातरी त्यास विज्ञानाची जोड आहे. प्राणघातकी कोरोना रोग ही निर्मित नसून नैसर्गीक आपत्तीतून जन्मलेला जीवघेणा रोग आहे असे म्हटल्यास वावगे ठरुनये अशी लोकसंकल्पना असली तरी त्यातील सत्य डावलून चालणार नाही अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसते आहे. राष्ट्रपती ते शिपाई आणी श्रीमंत ते भिकारी इथंपर्यंतचे सर्वजन जगण्यासाठी, जीवनाचे मूल्य जोपासण्यासाठी आणी उद्याची स्वप्ने साकारण्यासाठीच जगणे गरजेचे, महत्वाचे असल्यानेच संचारबंदी, लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन करुन प्रशासन व पोलीस यंत्रणेला सहकार्य करीत आहेत यामागे प्रत्येकाना जगावेशे वाटत आहे. हेच मूळ असावे यात संदेह नसावा.
कॅन्सर, र्हदयरोग किंवा अन्य कोणते रोग असते तर नौकरदार, श्रीमंत, गरीबानाही वारेमाप पैसे खर्च करुन उपचार करवून घेतले असते पण कोरोना कोवीड १९हा असा रोग आहे की तो अदृश्य असून संसर्ग जन्य आहे तो फक्त लागण झालेल्या रुग्णातच दिसतो अशा या भयानक प्राणघातकी रोगापासून मूक्ती मिळण्यासाठी आणी त्यास परावृतीत करुन जीवनमूल्ये जोपासण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरीक धडपडत असताना दिसत आहे. ही मानवी कृती, वृत्ती असली तरी तीस नैसर्गीक म्हणजेच विज्ञानवादी दृष्टीकोन असावा अशी ही लोक मानसिकता स्पष्ट होताना दिसते आहे.
कोरोनाग्रस्त कोरोनाची लागण झालेल्यासह तमाम भारतीय नागरीक हे भयावह असले तरी स्वतःहोवून लॉकडाउनचे पालन करीत असताना दिसत असले तरी सरकारकडून केवळ संदेश व सूचना व्यतिरिक्त कोरोना निर्मूलनासाठी ठोस उपाय-प्रक्रिया होताना दिसत नाही, केवळ आहे त्या औषधीवर उपचार कोरोना रोगावर मात करण्यात येत आहे. त्यात वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या सहकार्याना यश मिळत आहे ही जमेची बाजू असून त्यात भर म्हणून अधिकच्या औषधी व साधनसामुग्रीची गरज असल्याची चर्चा वैद्यकीय क्षेत्रातून होताना दिसते आहे. ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पूर्णत्वास न्यावी अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसते आहे.
जीवनातील मूल्य कशी, किती महत्वाची व अनमोल असतात याची जाणीव ठेवून बरेच महाभाग आजवर जगताना दिसले नाहीत पण आजघडीला त्याच्या कुटूंबासह एकत्रीत कोंडून घेवून, आलीया भोगासी तैसेच राहावे, म्हणून जगताना व कोरोना रोगाशी झूंज देवून उद्याचे जीवन धुंडाळण्यासाठी धडपडताना दिसतात. यातच आजवरचे असत्य विरुन जाते आणी उरते ते सत्य हेच वास्तव असावे यासाठी वेळ व काळाला महत्व देणे गरजेचे आहे, असावे अशीच लूप्त लोकभावना प्रकट होताना दिसते आहे.
लहान बालकापासून ते वृध्दापर्यंत कोरोनाचे विषारी जंतू पसरले आहेत. भारतीय आयूर्विज्ञान संस्था संशोधन करीत असून त्यावर पर्यायी औषधी व इंजेक्शन निर्मिती केली जात असली तरी स्वतःच्या जगण्यासाठी, जीवन मूल्ये जोपासण्यासाठी वेळ व काळाचे महत्व ओळखून टाळेबंदीचे कठोरतेने काटेकोरपणे पालन करणे हाच एक विकल्प भारतीय नागरीका समोर आहे वेगळे कांही सांगून वेळ मारुन नेण्याची ही परिस्थिती नव्हे, सरकारी कारवाई ही बुडत्याला काडीचा आधारी अशीच असावी अशी सर्वत्र चर्चा होत असली तरी केंद्र व राज्य सरकारचे आदेश पाळून त्यांच्या संदेशाचे पालन करुन स्थानीक जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेला सहकार्य करणे ही काळाची नितांत गरज आहे. यापासून जनतेने दूर न राहता स्वतःच स्वतःचे भक्षक न बनता स्वतःचे रक्षक बनून उद्याचे सुख पाहावे अशीच मानवी मूल्यांची आर्तहाक असावी असे लोकसमूहातून प्रकट होताना दिसते आहे.
एकंदरीत कोरोना कोवीड १९ हा विषारी रोग सर्वत्र पसरत आहे. पण भारत हा जगाच्या आजच्या क्षणापासून कितीतरी दुर आहे. याचे श्रेय वैद्यकीय क्षेत्राला जाते कारण विशेष औषधी, इंजेक्शन नसतानाही जीवापाडपणे डॉक्टराना मुकाबला केला करीत आहेत. म्हणूनच कोरोना भारतात अमेरिका, चीन, स्पेन, इटाली सारखा पसरत नाही. फोफावत नाही हे भारतीय नागरीकाचे भाग्य असावे किंवा कोवीड १९ च्या जंतूना परावृत्त करण्याची क्षमता भारतीय नागरीकांच्या शरीरात असावी असे वाटते. तरी ही मिळणार्या वेळेचा सदुपयोग आणी जीवनाची मूल्य हे वेळ आणि काळच ठरवित असतो. यासाठी उद्याच्या जगण्यासाठी कोरोना रोगाचा सामना करुन टाळेबंदीचे पालन करुन सरकारला सहकार्य करणे हेच अगत्याचे असावे, आहे असे वाटते.