मनपा प्रशासनाने वॉररुम कक्षा ऐवजी नागरीवस्तीकडे लक्ष द्यावे
लातूर (लातूर प्रभात प्र.) ः प्राणघातकी कोरोना वायरसमूळे जनता भयभीत झाली आहे. जिल्हाप्रशासन डोळ्यात तेल घालून कार्यरत आहे. जिल्हाधिकारी जी श्रीकांत हे तत्पर सेवेत आहेत. पण लातूर महानगरपलिका प्रशासन असून नसल्यागतच असल्याची चर्चा होत असतानाच लातूर मनपाने जंतूनाशक फवारणी कार्यक्रम हाती घेतला लातूरच्या पूर्व भागात फवारणी गाडी आली, गाली म्हणेपर्यंत ती गाडी कोठे गेली याचा पत्ता लागला नाही. घरे, दारे तर फवारणीविनाच राहिली तरी मनपा प्रशासन दक्ष अशा ऐकायला, वाचायला मिळतात याची तक्रारवजा चर्चा होताना दिसते आहे.
लातूर जिल्ह्यात एक ही कोरोनाबाधीत रुग्ण नव्हता पण निलंगा शहरात परदेशी बाधीत रुग्ण आढळल्याची माहिती कळताच मनपाचे महापौर, उपमहापौर तात्काळ बैठक घेवून मनपात कोरोना वॉरकक्ष स्थापल्याची घोषणा केली अन् नागरीकाचे डोळेचे विस्फारीत झाले. लातूरच्या पूर्वभागात गटारी साफ केल्या जात नाहीत. फवारणी नाही, पण लॉकडाउन असताना त्या मनपातील वॉर रुमचा जनतेला काय फायदा होणार आहे की कर्मचार्याना गप्पागोष्टी मारण्यासाठी अधिकृत अड्डाच अशीच उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे.
मागील काळात लातूर शहरातील मागासवस्तीत-अविकसीत भागात आरोग्याच्या सोयी सुविधा व्हाव्यात यासाठी लातूर महानगरपलिकेने फिरता दवाखाना सुरु केल्याची माहिती ऐकीवात होती. तो फिरता दवाखाना कोणी चोरला की तो कार्यरतच नव्हता अशी विचारणा होत असली तरी मागासभागातील रुग्णाना घरपोच सेवा देण्यासाठी लातूर महानगरपालीकेने फिरता दवाखाना विनाविलंब सुरु करावा अशी मागणी जनतेतून होताना दिसते आहे.