जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या कोरोनामूक्तीला निलंग्यात गालबोट कसे
लातूर (लातूर प्रभात प्र.) ः लातूर शहर व जिल्हाभरात भयावह अशा कोरोना रोगाने फैलाव केला होता. लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी कोरोनावर मात करण्यासाठी सर्व उपायोजनेसह सुत्रे हाती घेवून कोरोनाचा पाडावासाठी रात्रदिवस कार्यरत असताना आणि एकही रुग्ण कोरोना बाधीत नसला तरी जनतासंचारबंदी, लॉकडाउनवर लक्ष केंद्रीत करुन कोरोनाग्रस्तावर नजर ठेवूनच रोजची माहिती प्रसार माध्यमाद्वारे ते जनतेपर्यंत पेाहंचवीत होते अशातच परदेशी प्रवाशानी गालबोट लावल्यामूळे असे कसे झाले अशीच चर्चा होताना दिसते आहे.
जिल्हाधिकारी जी श्रीकांत हे लोकप्रतिनिधीचे सहकार्य लाभत नसतानाही स्वतःच्या अधिकारातील उपाययोजना आणि मुख्मंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमूख यांचे आदेश, सूचनाचे पालन करीत, करीत जनतेवर करडी नजर ठेवून कोरोना मूक्तीसाठी एकहाती लढा देत असतानाच निलंगा येथील स्थानीक प्रशासन व पोलीस यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळेच जिल्हासिमाबंदी असताना हरियानातून आंध्राकडे जानारे कोरोनाबाधीत रुग्ण निलंगा येथील धार्मीक स्थळात आश्रयास आले त्याना स्थानीक प्रशासन, पोलीस यंत्रणेसह धार्मीक स्थळाच्या पहारेकर्यानी ही मज्जाव केला नाही आणि निलंगा शहरात कोरोना बाधीत रुग्ण सापडले लातूरच्या रुग्णालयात दाखल अशी बातमी पसरली आणि जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या कोरोनामुक्ती लढाईला यश प्राप्त होण्याआधीच निलंगला शहराने गालबोट लावले अशी संतापजनक चर्चा होताना दिसते आहे.
विषारी कोरोना रोगाचा निपटारा करावा या हेतूने जिल्हाधिकारी जी श्रीकांत, वैद्यकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा आटोकाट प्रयत्न करीत असतानाच निलंगा येथील स्थानीक प्रशासन, पोलीस यंत्रणेच्या अक्षम्य हलगर्जीपणामूळे कोरोना मूक्तीच्या लढाईला नकळत अडसर ठरलेल्या स्थानीक प्रशासन अधिकारी व पोलीस यंत्रणेचे प्रमूखावर कडक कारवाई करावी अशी मागणी निलंगा परीसरातून होताना दिसते आहे.