खासदारांचा निधी वळवून कामगार-मजूरांचे बळी कशासाठी
दिल्ली (लातूर प्रभात प्र.) ः प्राणघातकी, महाकाय भयावह अशा कोरोना कोवीड १९ या विषारी रोगाचा मूकाबला करुन कोरोनामूक्त भारत करणेसाठी देशभरातील मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधीच्या सहाकर्यातून वैद्यकीय तज्ञ, डॉक्टर, त्यांचे कर्मचारी यांच्या मदतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दिवसरात्र एक करुन प्रशासकीय यंत्रणा हलवित असल्याने प्रधानमंत्री मोदी यांना तमाम भारतीय लोक धन्यवाद देत असून त्यांच्या आवाहनानुसार, जनता संचारबंदी, टाळेबंदी, टाळी-थाळीनाद, मेणबत्ती पाजळणे, पाचमिनीटे स्वब्ध उभे राहाणे असे आदेशाचे पालन करीत असून वैद्यकीय उपचार आणी केंद्र व राज्य सरकारच्या वैज्ञानिक सावधगीरीमुळे कोरोनाचे विषारी जंतू हळूहळू भारतातून पळ काढण्याचा प्रयत्न करीत असून केंद्र व राज्य सरकारी कर्मचार्याचे दोन टप्प्यात वेतन, केंद्र व राज्यातील लोकप्रतिनिधीच्या मानधनात कपात आणी ती रक्कम कोरोनाग्रस्तासाठी व औषधी, यंत्रसामग्रीसाठी खर्च करणार असल्याच्या भुमिकेबद्दल प्रधान मंत्री नरेंद्र मोदीना आमजनेतसह कोरोनाग्रस्त आणी कोरोनाबाधीत मृत जीवही धन्यवाद देत असतील अशी चर्चा होताना दिसते आहे. आणी त्यांच्या कृतीवृत्तीतून जनतेला रेागमूक्त होण्याची प्रधान मंत्री नरेंद्र मोदी याची तळमळ पाहून जनता मूकाटपणे स्वतःला कोंडवून घेवून स्वतःच धन्य होतानाचे चित्र दिसते आहे.
विशेष म्हणजे कोरोना मूक्त भारतासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे जिवापाड प्रयत्न करीत असतानाच देशभरातील लोकसभेतील सदस्य, राज्यसभेतील सदस्याचा विकास निधी दोन वर्षासाठी वळवून तो कोवीड १९ बाधीत रुग्णासाठी खर्च करण्याचा मनोदय व निर्णय प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यानी घेतला आहे पण विकास निधीतूनच शेततळे, तलाव, वेगवेगळे प्रकल्प उभे राहातात त्यातूनच गरीब कामगार, मजूराच्या हाताला काम मिळते, त्यांची उपजिविका भागते मग सरकारी काटकसर, खासदाराचा विकास निधी इतरत्र वळविल्यास मजूर, कामगाराना काम कोठून कसे मिळणार याचा खुलासा प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यानी केला नाही. यामूळे देशातील कामगार, मजूर जगायचे कसे की मरणाला कवठाळायचे धास्तीने ग्रासलेले दिसतात. यावरुन देशमहासत्ताक बनविणेसाठी परदेशवार्या झाल्या, नोटाबंदी झाली, भुसंपादन झाले, आता कोरोना मूक्त भारतासाठी विकास कामाचा खासदार फंड इतरत्र वळवून देशभरातील मजूर, कामगाराचा भुकबळी घेणे यातच तमाम भारतीयाचे स्वप्न दडलेले असावे यातूनच महासत्ताक भारत आणी कोरोनामूक्त भारत होईल यात संशय कशाला अशीच चर्चा होत असून देशासाठी, लोक रोगमूक्तीसाठी विषारी जंतूशी लढणारे नरेंद्र मोदी यांचे सारखेच कायमस्वरुपी प्रधान मंत्री असावेत अशीच लोकभावना व्यक्त होताना दिसेत आहे.