राज्यपाल कोश्यारी विरोधात राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र

राज्यपाल कोश्यारी विरोधात राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र 



मुंबई (लातूर प्रभात प्र.) ः महाराष्ट्राला भयग्रस्त प्राणघातकी कोवीड १९ या विषारी रोगाने विळखा घातलेला आहे.  अशा कोरोना रोगाचे निर्मूलन करणेसाठी देशपातळीवर प्रधान मंत्री नरेंद्र मोदी आटोकाट प्रयत्न करीत असून महाराष्ट्रात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, हे स्वतः रोग, संशयीत रुग्ण, बाधीत रुग्ण, आणी त्यावरील उपाय योजनेसह लॉकडाउनवर नजर ठेवून असल्याने शासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा, व जनतेच्या सहकार्यातून कोरोना रोगाचा सामना करण्यात येत असताना राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यानी स्वतः होवून राज्यातील अधिकारी, जिल्हाधिकारी, यांचेकडून व्हीडीओ कॉलवरुन माहिती घेवून अनेक सूचना दिल्याने राज्यात मुख्यमंत्री आणी राज्यपाल ही दोन सत्ताकेंद्र असूच शकत नाहीत यासाठी एकत्र येवून राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी शिवसेना एकत्र आल्याने सत्ताधारी राजकारण तापण्याचीच चिन्हे दिसत आहेत. 
 राज्यपाल या नात्याने कोश्यारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडून अहवाल मागवून शक्यतो सूचना करु शकतात पण वैयक्तीक सत्ताकेंद्रीत होवून स्वतंत्र कारभार करु शकत नसल्याने राज्यपालाच्या या अक्षम्य हस्तक्षेपाबद्दल राष्ट्रवादीचे शरद पवार यानी दुरचित्रसंवादाद्वारे तक्रार केली असून शिवसेनेचे खासदार संजय राउत यानीही एक राज्य आणी दोन सत्ताकेंद्रे असूच शकत नाहीत राज्यपाल कोश्यारी याची कृती संविधान विरोधी असल्याची प्रतिक्रिया दिली असल्याने कोरोना हटावच्या धामधूमीत राज्यपाल कोश्यारीनी नवीन वादाला तोंड फोडल्याने तर्कवितर्काला उधाण आल्याचे चित्र दिसते आहे.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या