विवेकानंद चौक पोलीस ठाणे राजकारणी बनले की काय

विवेकानंद चौक पोलीस ठाणे, राजकारणी बनले की काय


लातूर  (लातूर प्रभात प्र.) ः पोलीस हे जनतेच्या न्यायासाठी, जनतेच्या रक्षणासाठी असे ब्रिद् वाक्य घेवून कार्यारत असतात.  सद्यःस्थितीत कोरोना या विषारी रोगाने भयभित केले असल्याने अनेक पोलीस गस्तीवर असतील पण ठराविक पोलीस पोलीस ठाण्यात थांबतात.  पंरतू अशातच कोणी व्यक्ती पोलीस ठाण्यात घुसते, आरडाओरड करुन मला कारोना झालाय म्हणून गोंधळ माजवितोय, पोलीस ठाण्याचा ताबा घेतो.  पोलीस सहाय्यक निरिक्षकाच्या खुर्चीत बसतो काय, ठाणे अमलदार, पोलीस कर्मचार्‍यावर थुंकतो काय, त्यास घाबरुन आपणाशी कोरोना होईल म्हणून त्याभितीने पोलीस सैरभैर पळतात काय, अशी दुरावस्था विविवेकानंद चौक पोलीस ठाणे लातूरची अवस्था झाली असून विवेकानंद पोलीस ठाणे हे जनतेसाठी नसून राजकारणी बनलेकी काय अशीच उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे. हा धट्टाकट्टा व्यक्ती ठाण्यात घुसून हैदोस माजवितो, संगणक, लॅपटॉपची तोडफोड करतो, पण पोलीस बघ्याची भुमिका घेवून या बद्दल तो राजकारणी होता की गुंड होता, या संदर्भात ही चर्चा होताना दिसत होती.  कसेबसे कोणीतरी पकडले आणि शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता तेथील डॉक्टरानी तो ग्रस्त मनोरुग्ण असल्याचे सांगीतल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदण्यात आल्याचे समजते.  
 विशेष म्हणजे किरकोळ भांडणाची तक्रारी आली की, विवेकानंद पोलीस ठाणे कर्तव्यदक्ष बनते, आरोपी आणि तक्रारदाराकडून अर्थपूर्ण व्यवहारानंती तडजोड केली जाते.  पण दिवसा सकाळीच कोणी माथे फिरु मानोरुग्ण येतो आणि पोलीस ठाण्यावर ताबा मिळवितो, आणि पोलीस मात्र बघ्याची भुमिका घेतात, त्यात ठाण्यात उपस्थित असलेले पोलीस सवेत कार्यरत होते की, घरची व्याद नको म्हणून पोलीस ठाण्यात आधार घेतला होता कि काय अशी ही चर्चा होत असून विविकानंद पेालीस ठाणे लातूरच्या पोलीसांच्या गाफील पणावर संशय व्यक्त केला जातो आहे.  हे जनतेच्या असुरक्षतेचे लक्ष ठरते, मग आम जनतेच्या न्यायीक रक्षणाचे काय, अशीच उलटसूलट चर्चा होताना दिसते आहे.  या बाबीचा चौकशीअंती पोलीस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने न्याय निवाडा करतील काय अशी जनतेतून अपेक्षा व्यक्त होताना दिसते आहे. 
 कदाचित याच मनोरुग्णाच्या ठिकाणी कोणी माथेफिरु ठाण्यात घसुन भलतेच कांही अवचीत केला असता तर त्यास कारणीभुत कोणास धरावे अशी ही चर्चा नागरीकात होत असून अगोदरच अविकशीत परिसर असलेल्या विभागात पोलीस ठाणे कार्यरत असताना असे सतर्क नसलेले कर्मचारी कशासाठी असावेत अशा भागात कर्तव्यदक्ष आणि न्यायीक पारर्दशक सेवा देणारे अधिकारी कर्मचारी असावेत अशी ही मागणी आमजनतेतून होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या