कोरोना मुक्तीचे काम लयभारी पण कामगार मजूरांचे काय

कोरोना मुक्तीचे काम लयभारी पण कामगार मजूरांचे काय


लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना कोविड १९ या विषारी रोगाचे निर्मूलन करुन लातूर शहर व जिल्हा कोरोना मुक्त ठेवण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न चालू असून वैद्यकीय तज्ञ डॉक्टर नर्सेस व कर्मचारी पालक मंत्री अमित विलासराव देशमूख राज्य मंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी जी श्रीकांत हे रात्रदिवस कोरोनाग्रस्त व कोविड बाधीत रुग्णावरील उपचार व त्यांच्या सोयीसुविधासाठी लक्ष ठेवून असून टाळेंबदी व सामाजीक अंतराचे पालन काटेकोरपणे व्हावे, कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहावी यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने हे लक्ष केंद्रित करुन असल्याने विषारी अशा कोरोना कोविडचा फैलाव न होता तो स्थिर असल्याने जनता आहे त्या परिस्थितीत जिवन कंठीत असल्याचे चित्र दिसते आहे.  
 कोरोना कोविडच्या धास्तीमुळे आणि त्यांचा संसर्ग वाढू नये या कारणासाठी लॉकडाउन मुळे काम बंद असल्यामूळे कामगार मजूरांची उपासमार होत आहे.  मोफत धान्य मिळते ते अपुरेच तर कोणापर्यंत ते आलेच नाही अशी परिस्थिती असली तरी कामगार मजूर उपासपोटी राहून सामाजी अंतरासह लॉकडाउनचे पालन करीत आहेत.  त्यातच उपासपोटी राहून भुकबळीच्या दाडेत जगावे लागते आहे.  त्यासाठी ग्रामीण भागात रोजगारहमी योजनेच्या माध्यमातून कामगार मजूरांना काम द्यावे, तसेच शहरी भागात कारखाने उद्योग व्यवसाय व शासकीय बांधकामाच्या माध्यमातून कामगार मजूरांना कामे उपलब्ध करुन द्यावे तोच त्यांच्या जगण्यासाठी आधार होईल, कोरोना मुक्तीचे काम लयभारी पण कामगार मजूरांचे काय असा प्रश्‍न ही कामगार मजूरांतून पुढे येताना दिसतो आहे.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या