कर्जबुडव्यावरुन कॉंग्रेस भाजपाने
जनतेची दिशाभुल करु नये
दिल्ली (दै.लातूर प्रभात प्र.) ः सारा भारत कोरोना कोविड या विषारी रोगाने त्रस्त झाला आहे. त्यावरील उपाय योजना करुन देश कोविड मुक्त करणे अगत्याचे असताना सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षाच्या कॉंग्रेस मध्ये कर्ज बुडव्या उद्योजकाच्या प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून त्यातूनच जनतेची दिशाभुल करण्याचा हा एक अनाठायी प्रकार असावा अशी चर्चा देशभरातील मतदारातून व्यक्त होताना दिसते आहे.
मोदी चोक्सी, मल्यासह अनेकानी अब्जावदी रुपयाचा घोळकरुन कर्जावू रक्कमेला चुनालावून ते पळून गेले. त्यावेळी मोदी सरकार अंधळे होते काय, कर्जबुडवे पळाले कसे त्यांना कोणी परवानगी दिली, यावरही चर्चा झाली, पंरतू कर्जबुडवे, आम्ही कर्जाची आकडेवारी मागत असताना सरकारने ती दिली नाही. त्यामूळे कॉंग्रेससह विरोधी पक्ष नेते मुगगीळून बसले. आणि आजघडीला महिती अधिकारातून कर्जबुडव्या लोकांची अब्जावधी रक्कम जनते समोर आली. आणि कॉंग्रेसने भाजपा सरकारवर टिकेचा भडीमार सुरु केला. तर भाजपाने ही टिकेचे प्रत्यूत्तर देवून जनतेला दिशाभूल करण्याचा थयथयाट करुन वायफट खेळ सुरु केला असून आजी माजी सरकारला कर्जबुडवेगीरीतील गौडबंगाल चालू असताना एकमेकाचे उणेदुणे करीत न बसता पैसा रिझर्व्हबँकेतला असला तरी तो जनता उद्योजक, व्यापाराच्या व नौकरदाराच्या करा पोटीचा आहे, आरोप प्रत्यारोप करणारे किंवा कर्जबुडव्याचा घरचा नव्हे हे लक्षात घेवून सरकारने योग्य ती कारवाई करावी पंरतू प्रथमतः कोरोना हटावाला प्राधान्य द्यावे व सत्ताधारी विरोधकानी कलगीतूरा करु नये अशीच प्रतिक्रीया जनतेतून उमटताना दिसते आहे.