संपादकीय...
महाराष्ट्र दिनानिमित्ताने
महाराष्ट्र ही आधुनिक भारताची राजधानी आहे. त्यापेक्षाही महाराष्ट्र ही संताची, बुध्दीवादी, विचारवंत, शुरांची भुमी आहे. याच महाराष्ट्रातून स्वतंत्र भारताची लढाई सुरु झाली आणि दिल्लीत तिरंगा फटकला. तोच तिरंगा आज देशभरात डौलतो आहे. जगभरातील देश राज्यात तिरंगा डौलाने फडकतो आहे. महाराष्ट्र या शब्दाची निर्मिती हा वेगळा विषय असला तरी छत्रपती शिवाजी महाराज, झांसीची राणी लक्ष्मीबाई यांची ही भुमीही महाराष्ट्रच आहे. जे जे कांही घडले ते महाराष्ट्रातूनच घडले आहे. त्यामूळे भारत हा सर्वकस क्षेत्रात निपुन व विकसीत देश म्हणून जगा समोर आदर्शवत आहे. ते महाराष्ट्राच्या उर्जेतूनच म्हटल्यास वावगे ठरु नये.
भारत स्वतंत्र झाला, प्रांरभी द्वेभाषीक राज्याचे पहिले मुख्यमंत्री यंशवतराव चव्हाण झाले, आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला यश आले. १ मे १९६० साली महाराष्ट्र स्वंतत्र राज्य झाले. आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणच झाले. तेंव्हापासून भारताच्या आर्थिक जळघडणीत औद्योगीक क्षेत्र व तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे वाटते. कारण महाराष्ट्राची जडणघडण ही बुध्दीवंत विचारवंत आणि समाजसुधारकाच्या अथक प्रयत्न संघर्षातून झालेली आहे. त्याच्याच प्रेरणेतून आज महाराष्ट्र हा ताठ माणेने भारतच काय जगभरात स्वंतत्र अशी ओळख ठेवून आहे. याचा सार्थ अभिमान वाटतो. आणि आजघडीला महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवी पुर्तीवर्षात आपली वाटचाल काय असेल, या बद्दल भुमिका विशदकरणे होणे करणे गरजेचे असले तरी देशावरच कोरोना कोविडने विषारी रोगातून अतिक्रमण केल्यामुळे देशासह महाराष्ट्र ही कोरोना मुक्तिच्या लढाईत केंद्र सरकारच्या हातात हात घालून जनतेच्या आधारातून अग्रेसर असल्याने महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्राच्या महतीवर सावट निर्माण झाल्याचे चित्र दिसते आहे.
स्वतंत्रपुर्व काळापासून संतासह महाराष्ट्रातील बुध्दीवंतानाी समाज प्रबोधन जाती निर्मूलन समानता सर्वांगीन विकास जातीय वाद, अधंश्रध्दा निर्मूलनासाठी, प्रोबधन जनजागृती आंदोलने केले आहेत, वैचारीक लेखन, प्रतिकात्मक लढा, संवादातून परिवर्तन अशा अनेक प्रयोगातून महाराष्ट्र घडविण्या बरोबरच भारतही भक्कम धर्मनिरपेक्ष पुरोगामी लोकशाहीवादी तत्वाचा बनावा यासाठी वैचारीक लढाई केलेली आहे. त्या प्रबोधन कार्यात म.फुले, न्या.महादेव राणडे, गो.ग. आगरकर, पंडिता रमाबाई, बाळशास्त्री जांभेकर, विष्णु शास्त्री चिपळणुकर, गोपाळ कृष्ण गोखले, बाळ गंगाधर टिळक, या बुध्दीवंत प्रज्ञावंतासह याच मालिकेचे मेरुमणी बॅ.बी.आर. तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वैचारीक समतेची लोकशाहीवादाची उर्जा दिलेली आहे. हे सारे बुध्दीवंत महाराष्ट्रातील हिरे मोती आहेत. हे विसरता कामा नये. यातच आपले हित दडलेले आहे. हे नाकारता येत नाही.
भारत स्वतंत्र झाला. पंडीत जवाहरलाल नेहरु पंतप्रधान झाले तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे कायदा मंत्री झाले, आणि स्वतंत्र भारताची भारतीय राज्य घटना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच लिहीली आणि सामाजीक न्याय लोकशाही स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व हक्क देवून सामाजीक एकता व राष्ट्रीय एकात्मतेच्या धाग्यात बांधून भारत एकसंघ ठेवला. यात महाराष्ट्राची महत्ता निश्चित होते.
महाराष्ट्राच्या सामाजीक राष्ट्रीय चळवळीचे मुळ स्त्रोत सामंजस्य हेच आहे. म्हणूनच द्वेभाषीक राज्याचे व स्वतंत्र भारत झाल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशंवतराव चव्हाणच झाले. वार्षीक वयोमानानुसार महाराष्ट्र मुंबई, दिल्लीच्या राजकारणात बदल होत गेले पण कोणत्याही राजकारण्यानी महाराष्ट्राची वैभवशाली समानतेची सामंजस्याची परपंरा सोडलेली नाही. सत्ता संघर्षासाठी राजकीय संघर्ष करावा लागतोच तसा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ही नेतृत्वासाठी झाला होतो. पण शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, शाहीर गवाणकर, पठ्ठे बापूराव, यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी पर्वती पुणे येथील आंदोलन प्रसंगी शाहीरीतूनच सर्वपक्षीय नेत्यांना एकत्रित केले, आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ यशस्वी ठरली. १ मे १९६० साली महाराष्ट्र स्वतंत्र झाला आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई महाराष्ट्र उदयास आला हे विसरता कामा नये असे सांगण्याची गरज वाटत नाही. कारण आपण बुध्दीवंताच्या विचारवंताच्या महाराष्ट्राचे वारस हक्कदार आहोत, याची आपणास जाणीव असणारच म्हणून महाराष्ट्र दिन साजरा करताना मागचा इतिहास गुंडाळणार्यांना १९७० नंतरचा आणि आजपर्यंतचा महाराष्ट्र कोठे आहे, आज कोठे आहे, आणि उद्याचे महाराष्ट्राचे भवितव्य काय असणार आहे, हे लक्षात घेणे गरजेचे वाटते.
१ मे दिवस जा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो, तसाच १ मे दिवस जागतीक कामगार दिन म्हणून ही साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र दिन व कामगार दिनी महाराष्ट्राच्या उज्वल भविषासाठी सर्वांगीण विकास व प्रगती साध्य करुन पुन्हा एकदा जातीयवाद आणि धर्मवादाकडे जाणार्या महाराष्ट्र दिल्लीला सावरुन तशा घातकी वृत्ती प्रवृत्ती विचाराला थोपवून महाराष्ट्र, भारत हा बुध्दीवंताचा देश म्हणून पुढे नेवू असा संकल्प करुन नेहमीसाठी दिल्ली वार्या करण्याऐवजी दिल्लीकरानी मुंबई वार्या कराव्यात अशी जडघडण करावी व राजकीय मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्र दिनाचे व महाराष्ट्रीयन बुध्दीवंतानी दिल्लीचे तख्त मजबूत केले. तेच तख्त मुंबई महाराष्ट्र कणखर खंबीर, उर्जावत व अभिनव वैभवशाली करु शकते, हे निर्विवाद सत्य नाकारता येणार नाही, महाराष्ट्र दिनी तमाम महाराष्ट्रीन व भारतीयाना हार्दिक शुभेच्छा आणि कोरोना मुक्ति होवो ही अपेक्षा.