लातूरची गंजगोलाई सर्वानाच गोलमाल करते तेंव्हा..

लातूरची गंजगोलाई सर्वानाच गोलमाल करते तेंव्हा..



लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः लातूरची गंजगोलाई हे लातूरचे वैभवशाली प्रतिक आहे.  जुन्या लातूरचे ते महत्वाचे ठिकाण असून आई जंगदंबेच्या आर्शिवादाने लातूरकराना भरभरुन दिले आहे.  लातूरचे नांव आज महाराष्ट्र, भारत व कदाचीत देशाच्या नकाशातही अजन्म राहाणार आहे.  यात तिळमांत्र शंका नसली तरी, पुर्वीपासून आजही नविन कोणी गृहस्त चुकला तर तो फिरुन फिरुन गंजगोलाईतच येतो आणि मग त्याला कोणी तरी खरी वाट दाखवित असतो.  पंरतू गंजगोलाईचे खरे रुप गोलमालामुळे दिसत नाही.  
 आजघडीला गंजगोलाई हे लातूरचे मध्यवर्ती केंद्र ठिकाण आहे.  वैभवी प्रतिक आहे, गंजगोलाईत आई जंगदंबेचे मंदिर आहे, सभोवती मनपाची मालकीची व्यापारी संकुले आहेत, गंजगोलाई परिसर हा गोलाकार असल्याने रस्ते आणि आजूबाजूला व्यापारी दुकाने आहेत.  याच गोलाकार भागात रस्त्या नजीक फळ विक्रेते, भाजीपाली विक्रेते मनेरी, बांगडी व्यवसाय करणारे, हातावर पोट असणारे छोटे दुकानदार विक्रेते, आपले पोट भरणेसाठी फिरते गाडे किंवा बैठकीत दुकाने थाटून रात्री घरी जात असतात.  पंरतू त्यांना अद्याप ही कायम स्वरुपी जागा मिळाल्या नाहीत, मनपाची सत्ता बदलली की, अतिक्रमण हटाव मोहीम चालू होते, पुन्हा तेच ते रडत राहते, मात्र छोट्या व्यापारी रोजी पोट भरणार्‍या लोकांना मात्र गंजगोलाई गोलमाल करुन फिरवीतच राहते.  त्यांना अधिकृत जागा मिळतच नाही, सत्ताधारी मिळू देत नाहीत, अशी ही किमया या भैवभशाली गंजगोलाईची आहे.  याचा गोरगरीब जनतेसह रस्त्यावर पोटभरण्यासाठी हातगाडे व स्थायीक जागेवर भाजीपाला विक्री करुन जाणार्‍या आम कामगार व्यापार्‍याना सार्थ अभिमान वाटत असावा अशीच चर्चा आम जनतेत होताना दिसते आहे.  असाच अनुभव जेंव्हा आपण गंजगोलाईत फिरतो, फेरफटका मारतो, त्यावेळी लातूरची गंजगोलाई सर्वांनाच कशी गोलमाल करते तेंव्हाच अनुभवातून कळते.


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या