कोरोना बाधीताची माहिती दडविण्यात जबाबदार कोण

कोरोना बाधीताची माहिती दडविण्यात जबाबदार कोण



लातूर (दै.लातूर प्रभात प्र.)ः महाराष्ट्रासह लातूर जिल्हाही कोरोना कोविड या संसर्गीत रोगाने घेरलेला आहे.  प्रारंभीपासूनच जिल्हाधिकारी जी श्रीकांत आणि वैद्यकीय अधिकारी लातूर जिल्ह्यात कोविड १९ चा फैलाव होवू नये यासाठी जागृत राहून कसोशीने प्रयत्न करीत होते.  पण निलंगा-उदगीरने काळीमा फासला असला तरी ही कोरोना कोविडचे निर्मूलन करणेसाठी फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय सुविधेनुसार डॉक्टर व त्यांचे सहकारी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत.  आजघडीला कोरोना कोविड बाधीत रुग्णावरील उपचारानी उपचारा दरम्यान बरे झालेले रुग्ण घरी गेले की, क्वारंटाईन मध्येच आहेत याची माहिती मिळत नसून दररोज जिल्हाधिकारी जी श्रीकांत हे माहिती देत असतात, पूर्णतः विस्तारीत माहिती जिल्हाधिकारी कक्षातील अधिकारी ती दडवितात की, पत्रकारच जाणीवपूर्वक तशी माहिती लोकापर्यंत पोहंचू देत नाहीत, अशी कुजबूज लोका मध्ये होताना दिसते आहे. 


विशेष म्हणजे जिल्हाधिकारी स्वतःहोवून पत्रकाराना बोलावून माहिती देत होते.  अशी नेहमीच चर्चा होत होती.  पण आजघडीला तसे होत नाही, अशीच कांहीशी चर्चा शौकीन पत्रकारात होताना दिसते आहे. तसे असले तरी जिल्हाधिकारी जी श्रीकांत हे सक्षम कार्यतत्पर जिल्हाधिकारी असा नावलौकीक असलेले जी श्रीकांत हे कोरोना बाधीताची माहिती कशी काय दडवीतील अशी ही चर्चा होत असून पत्रकारच कमी पडत असावेत अशी ही चर्चा होताना दिसते आहे.  कोरोना कोविड रोगाचे निर्मूलन टाळेबंदी सामाजीक आंतराचे निर्बध या प्रकरणी दररोज नवनविन अटी नियम लागू होतात, कधी शिथील होतात, तर कधी कठोर निर्णय जिल्हाधिकारी घेत असल्याने त्यांना लातूर येथून इतरत्र बदली हवी आहे की काय अशी उलटसूलट चर्चा होताना दिसत असली तरी लोकहीतावह कारवाई करणे ऐवजी आवड्यातील दोन दोन दिवस व्यापार खरेदीसाठी मुभा दिल्याने यातून नागरीकांची गैरसोय होवू शकते, अशी ही चर्चा होत असली तरी ठरावीक दिवशीच बाजार करावा यासाठी लोकाकडे त्याच दिवशी पैसा असू शकतोय काय, याची जाणीव नियम व अटी लागू करणार्‍या अधिकार्‍याना आहे काय, याची चौकशी करुन जिल्हाधिकारी यांनी न्यायीक कार्यवाही करावी अशी मागणी होत असून कोविड कोरोना बाधीत रुग्ण त्यावरील उपचार आणि जनतेवरील लादल्या जाणार्‍या अटी व नियमातील अडसर कोण निर्माण करतो आहे, जिल्हाधिकारी व पत्रकारातील संवादाला अडथळा निर्माण कृती कोण करते आहे, यास जबाबदार कोण आहे, याचे निराकारण व्हावे अशी ही लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे. 
 कोरोना कोविड मधील वृत्तांकनासाठी पत्रकार दुर्लक्ष करीत आहेत की, जिल्हाधिकारी हेच पत्रकाराना जाणीवपूर्वक डा     वलत आहेत, अशी ही उलटसूलट चर्चा सामाजीक राजकीय कार्यकर्त्यातून होत असून यातील खरे काय ते पत्रकार आणि जिल्हाधिकारी यांनीच स्पष्टीकरण करावे अशी ही मागणी समोर येताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या