माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चुकतातच कस

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चुकतातच कसे



कोल्हापूर (दै.लातूर प्रभात प्र.)ः देवेद्र फडणवीस हे सामाजीक राजकीय कार्यकर्ते ते नागपुर महानगरपलिका पासून आमदार विरोधी पक्ष नेते मुख्यमंत्री पुन्हा विरोधी पक्ष नेते असे समाजकारण राजकारण केले, जाणकार अभ्यासू असलेले देवेंद्र फडणवीस यांनी परवा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनी अभिवादन करताना शाहू महाराज यांचा उल्लेख प्रसिध्द सामाजीक कार्यकर्ते असा प्रसार माध्यमातून केला त्यामूळे शाहू प्रेमीत चिढ निर्माण झाली ते सहाजीकच असल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाचा इतिहास संशोधक डॉक्टर जयंयसिंगराव पवार आणि खासदार संभाजी राजे यांनी निषेध केला असून देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर माफि मागावी अन्यथा कोल्हापूरच काय महाराष्ट्रात फिरु देणार नाही, अशी तंबी दिली असून कोल्हापुरातील शाहू महाराज प्रेमी ही चिढलेले दिसत आहेत.  
 राजर्षी शाहू महाराज यांनी जाती निर्मूलनासह समाजसुधारणेचा तिढा उचलून मानव मुक्तिसाठी आणि अस्पृश्यता निवारणासाठी आयुष्य झिजवीले अशा या लढाईतील राजर्षी शाहू महाराज हे थोर क्रांतीकारक होवून गेले, पंरतू त्यांचे विचार आजही प्रेरणाकारकच आहेत, अशा या राजर्षी शाहू महाराज यांच्या बद्दल जे विधान फडणवीस यांनी केले ते निदांजनक असून म.फुले यांच्या नंतर राजर्षी शाहू महाराज यांचाच क्रांतीकारक म्हणून नामोल्लेख होतो. असा इतिहास असताना फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात नागपुरी देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराजाचा सामाजीक कार्यकर्ते असा उल्लेख करणे ही बाब निदंनीय व निषेधार्य असून वेळीच जाहिर माफि मागून वातावरण निवळावे अशी मागणी होताना दिसते आहे.  पंरतू माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चुकतातच कसे अशी ही चर्चा होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या