कोरोनाच्या जनजागृतीसाठी न्यायाधीश उतरले रस्त्यावर
शहरात स्वतः ऑटोत बसून माईक द्वारे माहिती देऊन कोरोना बाबद केली जनजागृती व समुपदेशन
भोकर/(सिद्धार्थ जाधव) : कोरोना विषाणू हा महाभयानक असा विषाणू असून भारतासह जगावर या रोगाने थैमान घातला असून या भयानक विषाणू संदर्भात याचे परिणाम व गांभीर्य लक्षात घेऊन या विषाणूचा पराभव करून कोरूना वर विजय मिळवण्यासाठी केंद्र शासनाने व महाराष्ट्र शासनाने एक महिन्यापासून लागू केलेल्या लॉक डाउन चे उल्लंघन न करता त्या संधार्भातील कायद्याचे काटेकोरपणे पालन करून स्वतः सह समाजाला तसेच देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी एकच उपाय असून हा महाभयानक कोरोना विषाणू स्पर्शाने व एकमेकाच्या सहवासात असल्याने ह्या महाभयानक कोरूना विषाणूचा प्रसार होत असून आज तागायत विषाणूने जगामध्ये लाखो लोकांचा जीव घेतला आहे .
यामुळे यावर एकच उपाय म्हणून घरा बाहेर न निघणे, अतिमहत्त्वाच्या कामासाठीच घराबाहेर निघाल्यावर सोशल डिस्टन्सींग चा वापर करणे , बाहेरून घरी आल्यावर स्वच्छ हात धुणे ,सेणेटाइझर चा वापर करणे , व राज्य सरकारने वेळोवेळी तयार केलेले नियम व कायदे ह्यांचे काटेकोरपणे पालन करणे ,बाजारांमध्ये विनाकारण गर्दी न करणे,अशाप्रकारे उपाययोजनांचा तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून अवलंब केल्यास कोरोना सारख्या जगात थैमान घातलेल्या विषाणूचा पराभव करून नक्कीच विजय मिळू शकतो. अशी जनजागृती भोकर चे जिल्हा न्यायाधीश मा.मुजीब .एस. शेख यांनी स्वतः ऑटो मध्ये बसून माईक द्वारे लोकांना जनजागृती संधार्भातील माहिती दिली आहे.
संपूर्ण भोकर शहरातील चौका चौकात स्वतः माईक द्वारे अगदी तळमळीने लोकांना जनजागृती संदर्भात आवाहन करून शासनाला सहकार्य करण्याची विनंती देखील त्यांनी यावेळी जनतेला केली आहे.
शहरात रहदारीच्या ठिकाणी स्वतः ऑटोत बसून माईक द्वारे केले समुपदेशन
सरकारी सूचनांचे पालन करण्याची व सहकार्य करण्याचे केले आवाहन
संपूर्ण जगभर करुणा विषाणूने कहर केला असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केंद्र व राज्य शासनाने अनेक नियम व उपाययोजना अवलंबले आहेत त्यातील उपाययोजना म्हणून लॉकडाऊन सारखं कायदा करून कोरोना विषाणूचा प्रसार होण्यापासून काही प्रमाणात यश आले आहे.
ह्याचाच एक भाग म्हणून भोकर चे जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांनी स्वतः संपुर्ण भोकरला ऑटो मध्ये बसून फेरफटका मारीत लोकाना माईक द्वारे अगदी तळमळीने सरकारी सूचनांचे पालन करणे तसेच कोरोना या रोगाबाबत विहित त्या माहिती व सूचनांचे पालन करुन स्वतः सुरक्षित राहा व इतराना सुरक्षित ठेवा असे आवाहन त्यांनी यावेळी भोकर वासीयांना केले आहे.
कोरोना या भयंकर विषाणूवर नियंत्रण मिळन्यात सरकारला यश आलेले आहे ते केवळ जनतेच्या सहकार्याने.
तसेच आज जवळपास दोन महिन्यापासून जनता अनेक अडचणींना तोंड देत सरकारी सूचनांचे पालन करून सरकारला सहकार्य करत असल्यानेच हे यश मिळविणे शक्य झाले आहे अशी भावना देखील न्यायाधीश यांनी मांडली.
सरकार तसेच प्रशासन कर्मचारी सदैव चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर आहेत, त्यामुळे जनतेने कोणत्याही प्रकारची काळजी न करता केवळ कोरोना संधार्भातील सरकारी सुचनाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती देखील न्यायधीशानी भोकर वासीयांना यावेळी केली आहे. यावेळी जनजागृती मोहिमेत सहभागी जिल्हा न्यायाधीश मा.मुजीब.एस. शेख, वरिष्ठ न्यायाधीश मा.मंदार पांडे तसेच भोकरचे पोलीस निरीक्षक विकास पाटील ह्यांनी सहभाग घेऊन जनतेला कोरोना प्रतिबंधासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. न्यायाधीशांच्या या आवाहनाचे भोकरची जनता पालन करून कोरोना महामारीला नेस्तनाबूत करण्यासाठी नक्कीच सहकार्य करेल ही तमाम जनतेकडून आपेक्षा..॥