आजी माजी लोकप्रतिनिधी गायब, जळकोटकरांचे बेहाल

आजी माजी लोकप्रतिनिधी गायब, जळकोटकरांचे बेहाल


जळकोट (दै.लातूर प्रभात प्र.) ः लातूर जिल्ह्यातील उदगीर जळकोट हा विधानसभा मतदार संघ नेहमीच अडचणीत असतो.  मागील काळात भाजपाच्या सुधाकर भालेराव यांनी उदगीर जळकोटचे प्रतिनिधित्व केले.  आजघडीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय बनसोडे हे आमदार असून ते मंत्री मंडळात राज्य मंत्री म्हणून कार्यरत आहेत.  कोरोना कोविड निर्मूलनासाठी टाळेबंदी असल्याने गरजूना गरजू वस्तू व अन्न धान्य वाटप करण्यात आजी माजी लोकप्रतिनिधी वृत्तपत्रातून फोटोसह दिसतात.  मात्र आजघडीला आजी माजी लोकप्रतिनिधीच गायब बसल्याने उदगीर जळकोट मतदार संघातील जनतेचे बेहाल होताना दिसते आहे. 
 पाणी पुरवठा, बांधकाम, संसदीय कार्य राज्य मंत्री असलेले संजय बनसोडे हे कोरोना मुक्तिसाठी उदगीर मध्ये ठान मांडून बसले असल्याची खात्रीलायक वृत्त आहे.  ते उदगीर येथील संबधीत अधिकार्‍याना सुचना व आदेश देत असल्याच्या बातम्या फोटोसह वाचतो आहोत.  पण मंत्री बनसोडे हे आमच्याकडे कसे काय फिरकत नाही, असाच प्रश्‍न पडतो पंरतू विशेष म्हणजे आम जनतेसह जळकोट तालुक्यातील मेघा तांडा, रायपुर तांडा, अतनुर तांडा, चिटलंगी तांडा, शिवाजीनगर तांडा, गुत्ती तांडा, फकरु तांडा आदीसह गाव खेडे व वाड्यातील मतदार करीत असून टाळेबंदीमुळे उपासमारी होत असल्याने मंत्री बनसोडे हे आम्हाला संकटकाळी मदत करत नाहीत तर उद्या त्यांना मतदान कसे करावे अशीच चर्चा होत असून टाळेबंदीत तरी किमान अन्न व पाणी तरी मिळवून द्यावे अशी ही मागणी माजी आजी लोकपप्रतिनिधीकडे होताना दिसते आहे. 


 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या