कोरोना मुक्तिसाठी बंद हा पर्याय खुळेपणाचा
मुंबई (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना कोविडच्या महाभंयकर फैलावामुळे जनता वैतागून गेेलेली आहे. केंद्र व राज्य सरकार हे जालीम औषधी लस उपलब्ध करुन कोरोना कोविडग्रस्त बाधीतांना उपचार करुन त्यांची देखरेख करणे ऐवजी रोज नवनविन बंदी आदेश जारी करुन नागरीकानांच जिवन जगणे मुस्किल करुन ठेवीत असल्याने कोरोना मुक्तिसाठी बंद हा पर्याय नसून केवळ खुळेपणाच असल्याची चर्चा बंदी अडकलेल्या नागरीकातून होताना दिसते आहे.
कोरोना कोविड या विषारी जंतूचा प्रार्दूभाव होवू नये, यासाठी टाळेबंदी लागू केली, सामाजीक अंतराचे बंधन लादण्यात आले. एकवेळ नव्हे दोन वेळा नव्हे तिसर्यांदा ही बंदी लादून ही कांही प्रमाणात शिथील करण्यात आली. कोंडवाड्यातील व्यक्ती प्राणी एकदा बाहेर पडल्यानंतर आहे त्या ठिकाणी थांबण्याची अपेक्षा करणे ठिकच पण त्याला मर्यादा असाव्यात पण सरकारी यंत्रणा टोकदार बनून जनतेच्या भावनेलाच हात घालीत असून सर्वसामान्य जनतेच्या उद्रेकाचा संशय व्यक्त होताना दिसतो की काय अशीच कुजबूज चौका चौकात होताना दिसत होती.
लॉकडाउन शिथील करण्यात आले. परराज्यासह राज्यातील लोकांनाही आपापल्या गांवी जाण्यासाठी मुभा मिळाली म्हणून लोकांनी परवानगीसाठी गर्दी केली ती त्यांच्या मनात सरकारी नियमाचे भंग करण्याचा उद्देश नव्हता, तर घर जवळ करण्याची ओढ होती. हे सरकारने लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यात गरजू वस्तूसाठी परवानगी मिळाली, धान्य वगैरे मिळत होते पण इतर बाजारासह दारु खरेदीसाठी ज्या रांगा लागल्या त्या मद्यपिच्याच नव्हत्या तर उच्चभ्रू उच्चशिक्षीत लोकासह अधिकारी कर्मचारी नागरीकासह रांगा होत्या, त्यामूळे सर्वसाधारण जनता कामगार मजूरांच्याच रांगा होत्या हे चूकीचे असून त्यातील गांभीर्य लक्षात न घेताच एक दिवसातच मद्यविक्रीवर बंदी आणली गेली. अर्थात ही तशीच राहाणार नसावी कारण कधी ही बंदी उटली तरी काल जी गर्दी रांग होती, ती बंदी उटल्यानंतरही राहाणारच आहे. हे सरकारी बाबूच्या लक्षात येत नसावे. पंरतू सर्वकांही बंद करुन कोरोना कोविड मुक्ति करणे ऐवजी कांही तरी उपाय करुन ती मुक्ति करावी त्याशिवाय कोरोना मुक्ति होणार नाही. केवळ बंद हा पर्याय कोरोना बंदीसाठी लादने ही सरकारी भावना खुळेपणाचीच असावी अशी प्रतिक्रीया सरकारी कर्मचार्यासह सर्वसामान्य नागरीकातून उमटताना दिसते आहे.