संपादकीय...
माणसापरिस मेंढरं बरी...
माणूस विचित्र वागू लागला, वात्रट बोलू लागला की, आपण सहजपणे बोलून जातो की, याला काय मर्कटलीला लागल्यात पण आपणच न कळत पणे आपल्या निर्मितीतील पुर्वजाचाच उदोउदो करतो हे आपणास कळत नसते. पण मागच उकरुन काय मिळणार आहे, हे सोडा पण माणूस संवेदनशिल आहे. सुखदुःख पेलणारा आणि संकटकाळी एकत्रित येवून यशापशाची लढाई लढणारा हाच माणूस आजघडीला कोरोना कोविड १९ या विषारी संसर्गजन्य रोगाचा सामना करीत आहे. आणि या माणसाच्या धाडसातूनच सरकार जागृत झाले. आणि जनता कर्फ्यू, जनता लॉकडाउन व सामाजीक अंतराच्या पर्यायी आयुधातून कोरोना कोविड चा पाडाव करुन कोविड हद्दपार करण्यासाठीचा तिढा उचलला. त्यास देशभरातील नागरीकांनी भरभरुन पांठीबा देवून स्वतःहोवून कोंडवून घेतले. आणि सरकारी वाट सुकर झाली असेच म्हणावे लागेल.
जनतेचा वाढता पाठिंबा, टाळेंबदी, सामाजीक आंतराचे पालन यामुळे सरकारी बळ वाढले. वैद्यकीय तज्ञ डॉक्टार व नर्स आणि आरोग्य विभागातील कर्मचारी पुढे सरसावले. त्यांनी स्वतःचा जिव धोक्यात घालून डोळ्यात तेल ओतून अहोरात्र कोरोना कोविडच्या निर्मूलनासाठी रुग्णसेवा करीत आहेत. डॉक्टरी चमुच्या अथक प्रयत्नामुळे अनेक कोरोनाबाधीत रुग्ण बरे होवून घरी गेले. कोणी उपचार घेत आहेत, तर अनेक रुग्णाना मधुमेह, रक्तदाब, दमा किंवा र्हदयाचे रोगी आहेत. अशासाठी कोरोना कोविड ने ग्रासले असल्याने कदाचीत त्या रुग्णाना मृत्यूला सामोरे जावे लागले. ही बाब दुःखद असली तरी कोरोना कोविड या महाकाय प्राणघातकी विषारी संसर्गजन्य रेागाने आम जनतेला हैरान करुन सोडले आणि स्थानीक प्रशासनाची पाचारवर धारण सबली, तरी ही सक्षम पणे तत्पर सेवा देवून जनतेला धिर देण्याचे काम स्थानीक जिल्हा प्रशासनाने केले आहे. यापुढेही करावे लागणार आहे. त्यात कोरोना कोविड मुक्तिसाठी लॉकडाउन, सामाजीक आंतराचे पालन, मास्क लावून लोक रस्त्यावर येतात की, त्याचे उलंघन करतात, यावर करडी नजर ठेवून पोलीस यंत्रणा सज्ज असल्याने कोरोना कोविडचा फैलाव जास्तीचा होवू शकला नाही. हे सत्य नाकारता येत नाही. याचे श्रेय नागरीकासह डॉक्टर जिल्हा प्रशासन आणि पेालीस यंत्रणा वृत्तपत्राना द्यावे लागेल. याच सर्वमान्य माध्यमानी जनतेला जागृत ठेवून परिस्थिती काबूत ठेवली यात दुमत नसावे अशीच चर्चा होताना दिसते आहे.
कोरोना कोविडची संशयीत संसर्ग झालेले रुग्ण अधिकच पण तपासणी कोविड बाधीत रुग्ण कमीच, त्यात उपचारा दरम्यान बरे होवून गेलेले रुग्ण व कांहीचा अपवादात्मक मृत्यू याचा व्हावा कसा प्रचार प्रसार न होता, केवळ वाढती रुग्ण संख्याच लोका समोर येत असल्याने सर्वसामान्य जनतेत घबराहट निर्माण झाल्याचे चित्र दिसते आहे. कोरोना कोविडची एवढी धास्ती भिती बसली की, घरातून गरजू वस्तू आणण्यासाठी माणूस घरा बाहेर निघाला की, लवकर परत या, सांभाळून रहा, मी वाट पहाते, असे शब्द काणी पडत. आणि परत आलो की, कोणी भेटल होते का, ही विचारणा होते. या मागे कोणासी बोलले भेटले का, कोरोनाचा संसर्ग झाला का, हीच भिती होती आणि आहे. एवढा हा महाभंयकर कोविड १९ या विषाणूचा महारोग महाकाय होवून आम जनतेच्या माणगूटीवर बसला आहे. त्यासाठी मार्गकाढण्यासाठी सर्वोतपरीने शासन औषधी, लस निर्मितीसाठी तत्परतेने संशोधन करीत आहे. तर वैद्यकीय तज्ञ डॉक्टरर्स मंडळी जिवापाड कोविड बाधीत रुग्णावर उपचार करीत असून त्यास यश मिळते आहे. आणि कोरोना कोविड आजघडीला स्थिरावतो आहे. यात संदेह नसावा, अशी चर्चा वैद्यकीय क्षेत्रात होताना दिसते आहे. हीच जमेची बाजू असावी वाटते.
कोरोना कोविडचा पहिला, दुसरा, टप्पा संपला तिसर्या टप्यातील टाळेबंदी, सामाजीक अंतराचे निर्बध रेड, ऑरेजं, ग्रीन, या विभागात केले असून, रेड झोन मध्ये लॉकडाउन कठोर केले असून, इतर झोन मध्ये निर्बध शिथील केले असून, कांही अपवाद वगळता सर्वच व्यवहार सुरळीत पणे चालू करण्याचे आदेश केंद्र व राज्य शासनाने जारी केले असल्याने आम जनतेने टाळेंबदीतून बाहेर पडत असल्याने सुसकारा सोडा असून पर राज्या किंवा राज्यातच इतरत्र अडकून पडलेले लोक ही आपापल्या गांवी जाण्यासाठी शासनाच्या परवागनीनुसार येत आहेत. त्यामुळे नागरीकासह कामगार मजूरात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसते आहे.
कोरोना कोविडचे निर्मूलन करुन भारत कोरोना मुक्त करणेसाठी केंद्र व राज्य शासानाने लॉकडाउन व सामाजीक अंतराचे निर्बध लादले होते. पंरतू कोरोना कोविडचा विषारी रोगाचा संसर्ग स्थिरावल्याने आणि जनतेची होत असलेली नाके बंदी, शिथील करावी यासाठी कांही भागात कठोर निर्बध लागू करुन कांहीशी शिथीलता व इतर ठिकाणी सर्व मुभा दिल्याने कोंडवाड्यात अडकलेले नागरीक सैरभैर झाले आणि चोरुन बाहेर पडणार्यासह अनेकानी मेंढरासारखी गत निर्माण केली. हे दृश्य मुंबईसह राज्या राज्यातील शहर गाव भागातही दिसत असून पुन्हा शासकीय यंत्रणा पोलीसांची सामाजीक आंतरासाठी धावपळ होताना दिसते आहे. टाळेबंदी शिथील केली असली तरी सामाजीक आंतराची अट आहेच. पण कोंडून बसलेल्याना सैरभैर झाले आणि मेंढराच्या कळपासारेखच काल रस्त्यावर चौका चौकात माणसाचे थवे दिसू लागले. म्हणूनच प्रसिध्द मार्मीक सिने नट दादा कोंडके यांनी त्यावेळची सामाजीक परिस्थिती नागरीकांच्या वर्तनाचे बोलके शब्दाकंनी वर्तण, माणसापरिस मेंढरं बरी, असेच वर्णन केले होते. असाच प्रकार आज घडतो आहे, कारण मेंढरं ही मालकाच्या भाल्याकडे पाहून स्थिरावतात. पण आजची माणसं सरकारी आदेश नियमालाही झुंगारुन मनमानी करतात. हेच टाळेबंदी शिथीलतेवरुन आजघडीला चित्र दिसते आहे. म्हणून माणसातील आणि मेंेढरातील फरक हा सामाजीक आंतरालाही डाग लावतो की काय अशीच चर्चा होताना दिसते आहे.