नापीकीत कोविडचे लॉकडाउन त्यात पाणी टंचाईचे सावट

नापीकीत कोविडचे लॉकडाउन त्यात पाणी टंचाईचे सावट



लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः पावसाअभावी पिके गेली, अवकाळी पावसाने आहे ते नासून टाकले, त्यासाठीची भरपाई म्हणून शासना मार्फत शेतकर्‍याची कर्ज माफी व पिक विमा वाटप चालू असतानाच कोरोना कोविड या विषारी रोगाने कहर केला.  आणि नापिकीतला न्याय तसाच मागे पडला.  अशा परिस्थितीत कोरोना कोविड या रोगाने महाराष्ट्रासह लातूर ही होरपळून निघतो आहे.  अशा या महाकाय रोगाच्या निर्मूलनासाठी लॉकडाउन सामाजीक आंतराचे काटेकोरपणे निर्बध लादले गेले. त्यात गोरगरीब कामगारांना उपासमारीत जिवन कंठीत रहावे लागत होते.  अशातच सामाजीक आंतर कायम ठेवून टाळेबंदी शिथील केल्याने कामधंदा कोठे शोधावा, कोठे जावे, याचा मनोमनी शोध घेत असताना लातुरात पाणी टंचाई होणार अशी बातमी पसरल्याने आम जनता भयभित नजरेने एकमेकासमोर पाहतानाचे चित्र दिसते आहे. नेहमीच येणारे दुष्काळी परिस्थिती त्यात महागाईचा कहर असताना मागील काळातील तिव्र पाणी टंचाईची आठवण विस्मरणात गेली नसतानाच गेल्या वर्षी व चालू वर्षातील नापिकी त्यातच कोरोना कोविड या विषारी रोगाची लागण आणि त्यात टाळेबंदी व सामाजीक आंतराने जगणे कठीण झाले असतानाच उष्णतेचा वाढत चालेला ज्वर त्यातील बाष्पीभवनामुळे पाण्याची होणारी घट व मांजरा प्रकल्पातील कमी पाणी साठी असे निमित्त करुन लातूरला पाणी टंचाई होणार असल्याने आठ दिवसाआड होणारा पाणी पुरवठा दहा दिवसा ने होणार असल्याची कुणकुण लागल्यामूळे लातूर शहरातील नागरीक हैरान झाल्याचे बोलले जाते आहे.  नेहमीच्याच तिव्र पाणी टंचाईचे संकट लातूरकरा समोर असतानाही लातूरचे लोकप्रतिनिधी लातूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन गेली तीन चार वर्ष उलटत असताना ही, पाणी पुरवठा योजना कायम स्वरुपी कशी काय करु शकत नाहीत या बद्दल आश्‍चर्य व्यक्त होत असून लातूरचा पाणी प्रश्‍न कधी सुटणार की, पाणी पाणी म्हणूनच लोक नेहमीच लोकप्रतिनिधीना गोंजारीत बसावे अशीच संतापजनक चर्चा होताना दिसते आहे.  याकडे कर्तव्यदक्ष, पारदर्शक कारभारी व न्यायीक सेवा देणारे लातूर चे पालक मंत्री अमित देशमूख यांनी मनपा जिल्हा प्रशासनावर लक्ष देवून लातूरची पाणी टंचाई दूर करावी अशीच अपेक्षा आमजनतेतून व्यक्त होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या