असंघटीत वंचित कामगारांचे काय

असंघटीत वंचित कामगारांचे काय


मुंबई (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना कोविड या विषारी रोगामुळे व त्या रोगाचे निर्मूलन व्हावे यासाठी भारतासह मुंबई महाराष्ट्रात ही लॉकडाउन जारी केल्यामूळे उद्योग धंदे बंद पडले, कामगार मजूरांची काम नसल्यामूळे उपासमार होवू लागली.  त्यात घरी हातात पैसा नाही, लॉकडाउनचे बंधन यामुळे गांव ही गाठता येत नसल्याने कामगार मजूरांच्या नशीबी जिवंतपणीच मरणकळा शोसाव्या लागत होत्या, त्यात सरकारने नोंदणीकृत कामगारांना प्रत्येक दोन हजार रुपये सहानुग्रह अनुदान दिले, पंरतू असंघटीत कामगार व वंचित कामगार हे वंचितच राहीले.  त्याचा वाली नसल्याने ते घरका ना घाटका असेच झाल्याने कोविडग्रस्तीच्या काळात नोंदणीकृत कामगाराचे ठिक पण असंघटीत वंचित कामगारांचे काय असाच प्रश्‍न अनिर्णीत राहतो.  त्यांना न्याय कोण देणार आहेत.  अशीच मागणी पुढे येताना दिसत आहे.  
 शेती उद्योग  व्यवसाय बांधकाम ही सारी कामे मजूर कामगार करीत असतात.  पण त्यांचीच ही परवड कशासाठी हा प्रश्‍न मुंबईतील पत्रकाराने ऐरणीवर आनला.  यात उद्योजक व्यापारी बिल्डर्स नोकरदार लोकप्रतिनिधी कोरोना कोविडच्या माणूसमारीत ही सुखी आहेत, पण या सर्वच वर्गाना सुखी सावलीत बसविणार्‍या कामगार मजूरांनाच भुकमारीत जगावे लागते आहे.  अशा या कामगार मजूरांना न्यायीक हक्क व संरक्षणानी आणि काम नसेल तर सहानुग्रह अनुदान देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करुन अशा या वंचित कामगाराना महाराष्ट्र सरकारने न्याय देणे अपेक्षीत ठरते असेच मत व्यक्त केले. 


 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

*मुरूड परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही*

     लातूर/अहमदपूर: आज दिनांक 15.12.2025 रोजी रात्री 9.45 ते 10.05 मिनिटां सुमारास मौजे मुरूड, करकट्टा तालुका जिल्हा लातूर येथे मोठा आवाज हो...

लोकप्रिय बातम्या