वृत्तपत्र स्वातंत्र्यविरोधाचा पर्दाफास करु
दिल्ली (दै.लातूर प्रभात प्र.) ः वृत्तपत्र हा भारतीय लोकशाहीचा चवथा खांब आहे. जनतेला प्रबोधन करण्याचा आणि सामाजीक आर्थिक राजकीय घडामोडीवरील दिशादर्शने जनतेसमोर ठेवून निर्भिडपणे विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य वृत्तपत्रे व पत्रकाराना असून वृत्तपत्र स्वातंत्र्या बाबत वाईट प्रतिमा चित्रित सर्वेक्षणाचा पर्दाफास करुन पत्रकाराना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे असे माहिती व प्रसार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.
जागतीक वृत्तपत्र स्वांतत्र्य दिना निमित्ताने बोलताना केंद्रिय मंत्री जावडेकर म्हणाले की, भाजपाच लोकशाहीचा चौथा खांब उध्वस्त करु पाहत आहे. असे कॉंग्रेस म्हणते. यावर जावडेकर यांनी पलटवार करुन कॉंग्रेसच अशा प्रकाराना खतपाणी घालते. पंरतू भाजपा असे कधीच करणार नाही किंवा तसे प्रकार घडविणार नाही पंरतू मागील काय आणि कसे घडले, असेल तर ते आनावधानाने व त्याशी भाजपाचा संबध नाही, असे संागून पत्रकारानी जिव धोक्यात घालून कोरोना कोविड च्या विविध पैलूवर जनजागृती केली आहे. अशा या पत्रकाराना मी धन्यवाद देतो. असे सांगूण जावडेकरांनी भाजपाकाळातील पत्रकारांची हत्या व त्यांच्यावरील हल्ल्याचा उल्लेख टाळल्यामूळे आणि पत्रकाराना ऐनवेळी मज्जाव करणारे लोकप्रतिनिधी रंग कसे बदलतात याकडे दूर्लक्ष करुन जावडेकरांनी पत्रकारांची भलावण कशी काय केली अशीच चर्चा वार्तालाप प्रसंगी होत होती.