संरक्षण दलाची अवहेलना कशासाठी

संरक्षण दलाची अवहेलना कशासाठी



मुंबई (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना कोविड १९ या संसर्गजन्य रोगाने भारतावर आक्रमण केले. मुंबई शहर व राज्यालाही पोखरुन टाकले.  भारत देशावरील हे नैसर्गीक विषारी रोगाचे सावट कधीही विसरण्यासारखे नाही.  केंद्र व राज्य सरकारानी तेथील स्थानीक वैद्यकीय तज्ञ डॉक्टर, नर्स व आरोग्य विभागातील कर्मचार्‍याच्या सहकार्यातून जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाकाखाली कोरोना कोविड हा विषारी स्थिरावला कांही अंशी लागू केलेली टाळेबंदी शिथील केली गेली.  पंरतू सामाजीक आंतराचे निर्बध कायम ठेवूनच सारे व्यवहार सुरु करण्याचा निर्णय केंद्र सरकार व राज्य सरकारने घेवून लोक न्यायीक लढा जिंकला आणि कोरोना कोविडचा फैलाव रोखला.  यासाठी जनता केंद्र व राज्य सरकारसह वैद्यकीय अधिकार्‍याचे आभार व्यक्त करताना दिसते आहे.  मात्र कोरोना कोविडच्या युध्दातील यौध्याना संरक्षण दलाकडून माणवंदना ही कृती वृत्ती देशाच्या तिन्ही संरक्षण दलाची अवहेलनाच असावी अशी दबक्या आवाजात चर्चा होताना दिसते आहे.  
 भारताचे वायू दल, नौदल, भुदल, हे तिन्ही संरक्षण दले तमाम भारतीयांचे संरक्षण करीत असतात.  त्यांना जात धर्म नागरीक लोकप्रतिनिधी, असा भेद नसतो.  केवळ दुष्मनापासून देशाचे पर्यायाने नागरीकांचे संरक्षण करावे हाच उदात हेतू असतो.  घर दार संसार व स्वतःच्या जिवाची परवा न करता देशाच्या सिमेवर गस्त घालणारे युध्दात छातीची ढाल करुन दुष्मनाला सामोरे जाणारे सैनिकच सर्वश्रेष्ठ असतात.  मग तो भारताचा प्रथम नागरीक असो की, गल्लीतील एक भिकारी असो हे सारे लष्करा समोर गौणच म्हणजे नागरीक म्हणून महत्वाचे असले तरी लष्करा पेक्षा मोठे नसावे अशीच लोकभावना व्यक्त होते.  पंरतू तशी जाणीव व लष्कराचे महत्व पचवून घेण्याची लोकप्रतिनिधीत क्षमता असावी लागते.  पण तसे दिसत नसल्यामूळे संरक्षण दलाच्या तिन्ही दलाची अवहेलना करुन कोरोना युध्दातील यौध्याना मानवंदना देण्याची पाळी येते, ही बाब खचीतच भारतीय लोकशाहीला आणि प्रशासनाला काळीमा फासणारीच असावी अशीच उलटसूलट चर्चा होत असून त्या मागचा बोलविता करवीता धणी कोण असावा असे ही तर्कवितर्क लढविले जात असताना दिसत आहेत.  
 मागील काळात भारतीय लष्करांनी पाकिस्तानातील लष्करी छावण्या उध्वस्त केल्या होत्या.  त्या कारवाईला लष्कर प्रमूखाने सर्जीकल स्ट्राईक नाव देवून त्या कारवाईचे महत्व देशवाशीयाना पटवून दिले होते.  त्यावेळी केंद्र शासनाने लष्कराचे कौतूक न करता मोदी स्ट्राईक अशी भावना जनते समोर मांडण्यात आली.  कालपरवा कोरोना कोविड निर्मूलनासाठी थाळी नाद, घंटानाद केला गेला.  पुन्हा मेनबत्ती प्रज्वलन केले गेले.  ही अंधश्रधात्मक किमया प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचीच होती.  आता कोरोना कोविडचे निर्मूलन होते आहे.  तो स्थिरावतो आहे म्हणून डॉक्टर, प्रशासन, लोकप्रतिनिधी व पोलीसांचे लष्कराच्या वायूदल, नौदल, भुदलाच्या प्रमूखानीच मानवंदना करावी काय, हे कशाचे धोतक समजावे, यात काय दडले असावे, अशीच भिती आमजनतेतून व्यक्त होताना दिसते आहे. कोणत्याही रोगावर उपचार करणारे किंवा त्यांना सहकार्य करारे लोक लष्करापेक्षा मोठे कसे काय असू शकतात, या बद्दलही आश्‍चर्य व्यक्त होत असून अशा या कोरोना यौध्याना संरक्षण दलाकडून मानवंदना या प्रयोजने बद्दलचे स्पष्टीकरण प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनीच करावे अशी मागणी ही लोकातून होताना दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसलातूर मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणार

             लातूर, दि. 23 (जिमाका): राज्य परिव मध्यवर्ती बसस्थानक क्र. 1 लातूर येथील काँक्रीटीकरणाचे काम 27 जानेवारी, 2025 पासू...

लोकप्रिय बातम्या