अन्न पाणी ही लॉकडाउनच्या निर्बंधात
सोलापूर (दै.लातूर प्रभात प्र.)ः कोरोना कोविडचे निर्मूलन झाले पाहिजे. या विषारी रोगाचे समुळ उच्चाटन केले पाहिजे. म्हणूनच लोकानी पुढे येवून स्वतःला कोंडवून घेतले. पण केंद्र व राज्य शासनाने लॉकडाउनचा अतिरेक केला. आणि माणूस प्राण्या बरोबरच अन्न व पाणी ही टाळेबंदीच्या विरोधात आणून सोडल्याने नागरीकांना पाणी पाणी म्हणून भिक मागण्याची वेळ आल्याचे दिसते आहे. यावरुन शासनाचा निर्णय निर्भय पारदर्शक करण्याचा अनुभव हा, वाईटच असावा अशी सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.
शंकर खन्ना नावाचा मालवाहू ट्रक चालक हुमनाबाद येथून निघाला असता, रस्त्यावर कोठेच अन्न पाणी मिळाले नाही. पण सोलापूर येथील बेगमपुर चौकात पाणी प्यावे यासाठी तो रस्त्यावर गाडी थांबवीला, तेवढ्यात पोलीस शिपाई मित्र तेथे आले, आणि निघून जाण्यासाठी सांगीतले. पण किती ही मारा पंरतू पाणी द्या, अशी विनवणी करीत तो अन्न नाही तरी पाणी पाहिजे असा हट्ट धरुन बसला, त्याच वेळी टाळेबंदीच्या भितीने चौकातील लोकांनी घरेदारे बंद करुन घेतली पण त्याच वेळी आरबाज बागवान यांनी लखन ताकमोगे आले आणि विचारपुस करुन अन्न पाणी देवून त्यास पुढे पाठविले. पण सरकारी कोंडवा त्यात लॉकडाउनमुळे अन्न पाण्यावर ही निर्बंध यावे ही खचीतच बाब असून किमानपक्षी अन्न पाणी देण्यासाठीची हिम्मत तरी लोकामध्ये निर्माण व्हावी यासाठी टाळेबंदी कांही अंशी शिथील करावी अशीच मागणी आम जनतेतून होताना दिसते आहे.