जिल्हाधिकारी जी श्रीकांत बनले बंदी अधिकारी
लातूर (दै.लातूर प्रभात प्र.)ः कोरोना कोविड १९ चे निर्मूलन व फैलाव रोखण्यासाठी कोविड बाधीतावरील उपचारासह इतरांना संसर्ग होवू नये यासाठी केंद्र व राज्य शासनाने टाळेबंदी जारी केली. त्यात फिजीकल अंतराचे निर्बंध लादले, व हळुहळू परिस्थिती निवळत असल्याने शक्य त्या ठिकाणी फिजीकल अंतर कायम ठेवून टाळेंबंदी शिथील केली. आणि परिस्थितीनूसार ती शिथील करणे किंवा कठोर करण्याचे अधिकार स्थानीक जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याने परिस्थितीत सुरळीत होईल अशी अपेक्षा नागरीकातून व्यक्त होत होती. लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत हे सुरुवातीपासूनच लातूर जिल्ह्यात कोरोना कोविडचा फैलाव होवू नये, नागरीकांना ती लागण होवू नये, यासाठी कार्यरत आहेत. निलंगा, उदगीरची घटना वगळता जिल्हाभर कोविडची लागण नाही, जिल्हाधिकारी यांचे चौफेर लक्ष असल्याने नागरीक ही लॉकडाउन व फिजीकल अंतराचे पालन करीत होते. पंरतू लॉकडाउन शिथील झाल्याने वाढलेली गर्दी त्यामूळे दिवसाआड लॉकडाउन वाढवून त्यातच आठवड्यातून दोन दिवस ठरावीक दुकाने उघडी ठेवल्याने लोकांची ताराबंळ होत आहे. त्यात गर्दी वाढतच असते. अशात ठरावीक वेळेत किंवा दिवसात कोणाकडे दाम मिळत नाही. कोणाकडे असते, अशा ठरावीक वेळेतच मानसांना खरेदी करणे अवघड जाते. ही जाणीव जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांना नसावी म्हणूनच ते दररोज नियम अटी बदलून आणि वेळकाळ ठरवूनच जनतेची स्वतः सोय ठरवीत असल्यामूळे सर्वसामान्याची अडच होत आहे. पंरतू जिल्हाधिकरी जी श्रीकांत यांच्या सोबत काम करणार्या अधिकार्यांनी तरी तशी जाणीव जिल्हाधिकारी याना दिली पाहिजे होती. पंरतू तसे नसल्यानेच नागरीकात नाराजी पसरत असल्याचे बोलले जाते आहे.
विशेष म्हणजे काल रविवार असताना ही कडेकोट बंदी लादून नागरीकांना कैद्यापेक्षा ही कठोर वागणूक दिल्याने आजवर न्यायीक कार्य करणारे जिल्हाधिकारी जी श्रीकांत हे जाणीवपूर्वकच नागरीकांना त्रास देवून तशी माहिती वरपर्यंत गेली तर याच कारणावरुन बदली होईल व ती व्हावी यासाठीच तसा खटाटोप करीत आहेत की काय अशी ही चर्चा होत असली तरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीपेक्षा जिल्हाधिकारी जी श्रीकांत हेच सक्षम व कार्यरत असून त्यांचे कार्य चांगले व न्यायीक असल्याने जिल्हाधिकारी जी श्रीकांत हेच असावेत, रहावेत अशीच लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे. त्यातच जिल्हाधिकारी बनले बंदी अधिकारी कसे काय असे होत असावे असेही कुतूहल व्यक्त होताना दिसते आहे.