कोरोना कोविड संसर्गजन्य रोगाचा विचार करुण म.फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित 

कोरोना कोविड संसर्गजन्य रोगाचा विचार करुण म.फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित 


      मुंबई- देशात कोरोनाचं भयंकर संकट असून, त्याला महाराष्ट्रालाही सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असल्यानं प्रशासनही हतबल झालं आहे. प्रशासनानं कोरोनाला थोपवण्यासाठी उपाययोजना राबवल्या असल्या तरी त्या तोकड्या परत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं मंत्रिमंडळाची बैठक घेतली असून, काही निर्णय घेतले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. जन आरोग्य योजनेच्या सर्व अंगीकृत रुग्णालयात याचा फायदा घेता येणार असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं हे निर्णय घेतले आहेत.


ठाकरे मंत्रिमंडळातील सहा महत्त्वाचे निर्णय


• राज्यातील सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ


• निसर्ग चक्रीवादळ: वादळाची तीव्रता लक्षात घेऊन किनारपट्टीवरील जिल्ह्यातील लोकांना आपापल्या घरांतच थांबण्याचे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामावर


• मुंबई उच्च न्यायालय विधि समिती व उपसमितीसाठी सचिव पदाच्या निर्मितीस मान्यता. मुंबईसह नागपूर आणि औरंगाबाद साठी प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण तीन पदांची निर्मिती.


• ठाणे येथे एक अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापना.न्यायालयासाठी आवश्यक पदनिर्मितीस देखील मान्यता.


* मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नियुक्तीबाबत


* डीएमआयसी प्रकल्पातील दिघी औद्योगिक क्षेत्रासाठी एमआयडीसी विकासक


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या