धिरज देशमुख यांच्या पाठपुराव्याने आपत्तीग्रस्तांना शासनाची मदत 

धिरज देशमुख यांच्या पाठपुराव्याने आपत्तीग्रस्तांना शासनाची मदत 



लातूर : नैसर्गीक आपत्तीत नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांना शासनाची मदत मिळावी म्हणून लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे दोन आपत्तीग्रस्तांना शासनाकडूुन मदतीचा धनादेश देण्यात आला़ 
 लातूर तालुक्यातील तांदूळवाडी येथील सूर्यकांत रावण घाटगे यांच्यावर द़ि १९ एप्रिल २०२० रोजी वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला तर याच तारखेला गातेगाव येथील राजेंद्र सोपान मस्के यांचा एक बैल वीज पडून मृत्यू पावला होता़ या दोघांना शासनाची मदत मिळावी म्हणून आमदार धिरज विलाराव देशमुख यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता़ द़ि २ जून रोजी येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या लातूर ग्रामीण मतदारसंघाच्या आढावा बैठकीदरम्यान मयत सूर्यकांत घाटगे यांच्या पत्नीस व राजेंद्र मस्के यांना आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला़ 
 यावेळी उपविभागीय अधिकारी सुनिल यादव, लातूरचे तहसीलदार स्वप्नील पवार, रेणापूरचे तहसीलदार राहूल पाटील, औसाचे तहसीलदार श्रीमती पुजारी, इतर अधिकारी तसेच रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, विजय देशमुख, संभाजी रेड्डी, प्रविण पाटील यांची उपस्थिती होती़


वैशिष्ट्यीकृत बातम्या

*मुरूड परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही*

     लातूर/अहमदपूर: आज दिनांक 15.12.2025 रोजी रात्री 9.45 ते 10.05 मिनिटां सुमारास मौजे मुरूड, करकट्टा तालुका जिल्हा लातूर येथे मोठा आवाज हो...

लोकप्रिय बातम्या