*अमिर पठाण यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या* *व्यक्तिविरुध्द कठोर कायदेशीर कार्यवाही करावी**लातूर शहर जिल्हा काँग्रेसकडून पोलीस अधिक्षकांना निवेदन सादर*

      
       लातूर (प्रतिनिधी) मंगळवार दि. ६ मे २०२५ : लातूर शहरातील अमिर पठाण या तरुणास अज्ञात व्यक्तींकडून संवीधान चौक पाण्याची टाकी जवळ शुल्लक कारणावरुन मारहाण केली, धमकावण्यात आले, त्याचा धर्म विचारून पाकीस्तानातून आला आहेस का असे म्हणून मानसीक छळ करण्यात आला. या मारहाणीचे चित्रीकरण करुन ते समाजमाध्यमावर प्रसारीत करण्याची धमकी त्यास दिली .या मानसीक तणावातून अमिर पठाण यांनी आत्महत्या केली. ही घटना गंभीर असून या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ तपास करून या घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तिवर कठोर कायदेशीर कार्यवाही करावी याबाबत मंगळवार दि. ६ मे रोजी सकाळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने लातूर शहरातील पोलीस अधिक्षक कार्यालयात जाऊन लातूरचे पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करून त्यांच्याशी या गंभीर विषयाबाबत सविस्तर चर्चा केली आहे. 
       अमीर पठाण यांच्या पत्नीने एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली त्यावरून अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा नोंद झाला आहे. या अज्ञात गुन्हेगाराने सोशल मीडियावर मारहान, शिवीगाळीचे फोटो तसेच व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी दिली या कृत्यांमुळे मानसीक तणाव घेऊन अमीर पठाण यांनी आत्महत्या केली आहे, तसेच पठाण यांचे कुटुंबीय सध्या प्रचंड दहशतीखाली व तणावाखाली असून ही घटना अत्यंत गंभीर असून त्यामुळे लातूर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याची कल्पनाही लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने लातूरचे पोलीस अधिक्षक सोमय मुंडे यांना यावेळी दिली आहे. 
       याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस ॲड. मोईज शेख, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲङ. किरण जाधव, फारुख शेख, इम्रान सययद, सुपर्ण जगताप, असिफ बागवान, प्रविण सुर्यवंशी, विष्णूदास धायगुडे, तबरेज तांबोळी, राहूल देशमुख,खाजा पाशा शेख, कलीम तांबोळी आदी उपस्थित होते. 
---

वैशिष्ट्यीकृत बातम्या

*विनापरवाना ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एयरक्राफ्ट,पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअर बलून इत्यादीच्या उड्डानावर बंदी. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेश निर्गमित.*

       लातूर (पोअका) : सद्याच्या भारत पाकिस्तान युध्दजन्य परिस्थीतीमध्ये दहशतवादी/राष्ट्रविरोधी घटक ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एयरक...

लोकप्रिय बातम्या