लातूर, दि. 06 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद हरिबा काळे, प्रा. मच्छिंद्रनाथ तांबे व डॉ. मारुती शिकारे हे आयोगाच्या कामकाजानिमित्त 7 व 8 मे या दोन दिवसांच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद हरिबा काळे, प्रा. मच्छिंद्रनाथ तांबे व डॉ. मारुती शिकारे यांचे बुधवार, 7 मे रोजी लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व मुक्काम. गुरुवार, 8 मे रोजी सकाळी 10.30 वाजता ते इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती या संवर्गास 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत वितरीत केलेली जात प्रमाणपत्रे यांचा आढावा घेतील.सकाळी 11.30 वाजता पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकांची रिक्त पदे भरतीमध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, सामाजिक आर्थिक मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या संवर्गाच्या आरक्षणाच्या टक्केवारीनुसार मिळणाऱ्या प्रतिनिधित्वाबाबत लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक व विभागीय आयुक्त कार्यालयातील सहायक आयुक्त (मावक) यांची लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतील. दुपारी 1 वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
दुपारी 2 ते सायंकाळी 5 या कालावधीत लातूर तालुक्यातील वासनगाव, निलंगा तालुक्यातील अंबुलगा व हनुमंतवाडी, औसा तालुक्यातील तळणी येथील सगर गवंडी समूहाची क्षेत्रपाहणी करतील. सायंकाळी 8.30 वाजता धाराशिवकडे प्रयाण करतील.