*"नीट" परीक्षा निर्वीघ्नपणे पार पाडण्यासाठी लातूर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त.*

      
      लातूर  (पोअका) : लातूर जिल्ह्यातून 20 हजार 801 विद्यार्थी नीट परीक्षेला सामोरे जाणार आहेत. त्यासाठी लातूर जिल्ह्यात 51 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. एकाच सत्रात 4 मे रोजी दुपारी  होणाऱ्या या परीक्षेसाठी केंद्रावर आधीच बायोमेट्रिक हजेरीसाठी पोहोचावे लागणार आहे. दरम्यान, सदरची परीक्षा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने  जय्यत तयारी केली असून, परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
       राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत नीट-2025 ही परीक्षा 04 मे 2025 रोजी दुपारी 2 ते 5 लातूर जिल्ह्यातील विविध 51 उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक पोलीस अधिकारी व इतर पोलिस अमलदारां चा बंदोबस्त देण्यात आला आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी येणार असून परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांवर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता लातूर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सदर बंदोबस्त करिता लातूर जिल्ह्यातील पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, 60 पोलीस अधिकारी,391 पोलीस अंमलदार, तर 300 होमगार्ड यांची तैनाती करण्यात आली आहे.
      जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी 4 मे 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रांच्या 100 मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्या अनुषंगाने परीक्षार्थी विद्यार्थ्यासोबत येणाऱ्या पालकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटीचे पालन करावे. विनाकारण गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या