लातूर, : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले 30 एप्रिल, 1 मे आणि 2 मे 2025 या तीन दिवसांच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
पालकमंत्री श्री. भोसले यांचे 30 एप्रिल रोजी दुपारी 4:30 वाजता लातूर येथे आगमन होईल व शासकीय विश्रामगृह येथे राखीव. सायंकाळी 5:45 वाजता शासकीय विश्रामगृह येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील. जिल्हाधिकारी कार्यालय येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा - 2025 समारोप सोहळ्यास उपस्थित राहतील. सायंकाळी 6:30 वाजता अंबेजोगाई रोडवरील अजिंक्य सिटी येथे आगमन आणि राखीव. रात्री 8:30 वाजता एमआयटी मेडिकल कॉलेज कॅम्पस येथील प्रयाग निवास येथे आगमन व राखीव. त्यानंतर सोयीनुसार लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन आणि मुक्काम.
पालकमंत्री श्री. भोसले यांच्या उपस्थितीत 1 मे रोजी सकाळी 8 वाजता महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदना समारंभ होईल. सकाळी 10 वाजता औसा रोडवरील गांधी हॉस्पिटलजवळ नवीन बांधकाम भवन इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. सकाळी 10:45 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लोकनेते विलासराव देशमुख मार्गाची (फेज-2) पाहणी, सकाळी 10:55 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत आणि नियोजन भवनाची पाहणी करतील. त्यानंतर शासकीय विश्रामगृह, लातूर येथे आगमन आणि राखीव.
पालकमंत्री श्री. भोसले यांच्या उपस्थितीत दुपारी 3:15 वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र पाणी संरक्षण अधिनियम 1976 च्या प्रभावी अंमलबजावणीच्या आढावा बैठक होईल. दुपारी 4 वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालय येथे लातूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस ते उपस्थित राहतील. याठिकाणी त्यांच्या उपस्थितीत सायंकाळी 5 वाजता पाणीटंचाई आढावा बैठक, सायंकाळी 5:30 वाजता जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आणि पीक विमा आढावा बैठक आणि सायंकाळी 6:30 वाजता जल जीवन मिशन बैठक होणार आहे. त्यानंतर ते लातूर शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण करतील आणि राखीव. रात्री 8 वाजता त्यांचे औसा येथे आगमन होईल. तसेच सार्वजनिक बांधकाम कार्यालय आणि शासकीय विश्रामगृहाच्या लोकार्पण कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. त्यानंतर औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांचे निवासस्थान येथे आगमन आणि राखीव. सोयीनुसार औसा शासकीय विश्रामगृह येथे आगमन आणि मुक्काम.
पालकमंत्री श्री. भोसले हे 2 मे रोजी सकाळी 8:30 वाजता लामजना पाटी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण, अभिवादन करतील. यावेळी कव्हा ते लामजना पाटी महापुरुष मार्गाचे सादरीकरण होईल. सकाळी 9 वाजता तांबरवाडी येथे शेतरस्ता, जलजीवन मिशन विहीर, बिहार पॅटर्न वृक्ष लागवडीची पाहणी करतील. सकाळी 10 वाजता कासारशिरसी येथे कासारशिरसी पाणीपुरवठा योजना (एमजीपी) शुभारंभ, अप्पर तहसील कार्यालय, अधिकारी आणि महसूल कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकामाची पाहणी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय आणि विश्रामगृहाचे लोकार्पण, बसस्थानकासमोरील रस्त्याचे भूमिपूजन, बसस्थानक येथे सभा आदी कार्यक्रमांना उपस्थित राहतील. दुपारी 1 वाजता किल्लारी येथे किल्लारी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण आणि अभिवादन करतील. दुपारी 1:15 वाजता मातोळा ते आशिव-निळकंठेश्वर मार्गाची पाहणी करतील. दुपारी 2 वाजता आशिव पाटी येथे महावितरणच्या 33 केव्ही विद्युत उपकेंद्राचा शुभारंभ होईल. दुपारी 3 वाजता तावशीताड येथे जिल्हा वार्षिक योजना आणि नरेगा अभिसरणातून बांधलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी करतील.
पालकमंत्री श्री. भोसले हे दुपारी 3:15 वाजता बेलकुंड सास्तुर रस्त्याची आणि विस्तारीत एमआयडीसी येथे पाहणी करतील. दुपारी 3:30 वाजता माळुंब्रा येथे महावितरणच्या 33 केव्ही विद्युत उपकेंद्र आणि गावठाण फिडर लोकार्पण कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. सायंकाळी 4 वाजता बोरफळ येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक शिक्षणोत्तर सुविधा लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहतील. सायंकाळी 5 वाजता औसा येथे गोपाळपुर-तीर्थक्षेत्र भक्त निवास विकास कामाचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहतील. सायंकाळी 5:20 वाजता जुने बसस्थानक, औसा येथे नगर परिषद सार्वजनिक शौचालय, उंबडगा रस्ता (पीएमजीएसवाय) लोकार्पण, सिमेंट नाली शुभारंभ आणि ग्रामीण रुग्णालय ते कारंजे खडीकेंद्र (बायपास रोड) लोकार्पण कार्यक्रमाला पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 5:30 वाजता औसा येथील 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाल उपस्थित राहतील. त्यानंतर सोयीनुसार औसा येथून मोटारीने साताराकडे प्रयाण करतील.
*****