लातूर, दि. 24 (जिमाका) : लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांनी प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरावरील युवा पुरस्कार दिले जाणार आहेत. यामध्ये एक युवक, एक युवती आणि एक नोंदणीकृत संस्था यांना गौरविण्यात येणार आहे.
या पुरस्कारात गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि वैयक्तिकसाठी १० हजार रुपये आणि संस्थेसाठी ५० हजार रुपये याप्रमाणे रोख रक्कमेचा समावेश राहील.
या पुरस्कारासाठी ग्रामीण आणि शहरी भागातील सामाजिक कार्य, राज्याच्या साधन संपत्तीचे जतन व संवर्धन, राष्ट्र उभारणीसाठी सहाय्यभूत कार्य, समाजातील दुर्बल घटकांसाठी कार्य, शिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक,कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता, नागरी वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन, स्थानिक समस्या सोडवणे आणि साहस यासारख्या क्षेत्रांतील कार्याचा विचार होईल. १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीतील गेल्या तीन वर्षांतील कामगिरीचे मूल्यमापन करून पुरस्कार दिले जातील.
अर्ज आणि अधिक माहितीसाठी तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती सारिका काळे (मो. ७२१८३९०३६७) किंवा क्रीडा अधिकारी धीरज बावणे (मो. ८००७९०७७१३) यांच्याशी संपर्क साधावा. परिपूर्ण अर्ज २८ एप्रिल २०२५ पर्यंत लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.
*****