लातूर : दि.अखिल भारतीय मातंग संघ व बाबासाहेब गोखले सेनेच्या वतीने विविध मागण्याचे जिल्हाधिकारी लातूर यांच्यातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.वंचित, बहुजन, उपेक्षीत आणि मातंग समाजाचा सर्वांगीन विकास होण्यासाठी लढा देऊन मातंग समाजाला विकासाचा मार्ग दाखवणाऱ्या क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व त्यांचे कार्य नवपिडीला अवगत होण्यासाठी खालील मागण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण (अबकड) तात्काळ मंजूर करून मातंग समाजाला स्वतंत्र 8% आरक्षण देण्यात यावे. समिती गठीत करून हाकनाक वेळ घालवू नये. मातंग समाजावरील अन्याय, अत्याचार होऊ नये म्हणून स्पेशल विशेष फोर्स प्रत्येक जिल्हयात तयार करण्यात यावा. बहुजन मातंग समाजाचे लोकनेते व अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जनक क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांची जयंती 7 मे रोजी शासनाने करावी. व 7 मे रोजी शासकीय सुट्टी जाहिर करावी. लातूर जिल्हयाचे सुपूत्र क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांच्या मुळ गावी चिखली ता. अहमदपूर येथे भव्य स्मारक उभे करावे. अण्णाभाऊ साठे संशोधन केंद्र (आर्टी) प्रत्येक जिल्हयात कार्यान्वीत करून स्वतंत्र कर्मचारी भरती करावी. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे बजेट वाढवून 7 लाखापर्यंतच्या कर्जास कोणत्याही प्रकारची जामीन (गॅरंटर) घेऊ नये. मातंग समाजचे नेते क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांचे राष्ट्रीय स्मारक बाबासाहेब गोपले भवन, अण्णाभाऊ साठे नगर, मानखुर्द, मुंबई येथे शासनाने बांधून द्यावे. क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांनी स्वतः चंदनाप्रमाणे झिजून दलित, मातंग समाजाला शासनाकडून न्याय मिळवून दिला. त्याची नवपिडीला आठवण म्हणून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यीक व कलावंत यांना बाबासाहेब गोपले समाजभुषन पुरस्कार देऊन सन्मानीत करावे. बाबासाहेब गोपले यांचे निधन झाल्यानंतर शासनाने तिरंगा झेंडयाची सलामी देऊन अंत्यसंस्कार केले अशा थोर महापुरूषाची प्रतिमा (फोटो) सर्व शासकीय कार्यालयात लावण्यात यावे व तसा शासन निर्णय (जी.आर.) तात्काळ काढावा. लातूर येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्या जवळील खुली जागा अण्णाभाऊ साठे सांस्कृतीक सभागृह व संग्रालयासाठी देण्यात यावी.या मागण्या तात्काळ मान्य करून तसे आदेशीत करावे असे निवेदनात म्हटले आहे.
एवढेच नाही तर शासनाने बहुजन, मातंग समाजाचा अंत पाहू नये. असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर ॲड.अंगद गायकवाड नागनाथ कांबळे,ॲड. हुशेन वाघमारे, पत्रकार लहूकुमार शिंदे, नंदू राऊत, अभिषेक माने इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.