लातूर (पोअका) : लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवून अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत. लातूर पोलीस कडून मोठ्या प्रमाणात मासरेड चे आयोजन करून जिल्ह्यातील लपून-छपून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणावर जोरदार कारवाई करत हातभट्टी दारू तयार करणारे, देशी-विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करून लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त व हातभट्टीच्या मुद्देमाल नष्ट करण्यात येत आहे. दिनांक 06 मे 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे लातूर ते रेणापूर जाणाऱ्या रोडवरील महापूर गावाच्या शिवारामध्ये एक व्यक्ती त्याच्या शेतातील पत्राच्या शेडमध्ये हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल नवसागर (Ammonium Choroid) च्या गोळ्या, निकृष्ट दर्जाचे गुळाची साठवणूक केली आहे अशी माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महापूर गावाच्या शिवारातील पत्राच्या शेडवर छापा मारला. तेथे 07 किलो नवसागर (Ammonium Choroid) च्या गोळ्या व 80 बॅग निकृष्ट दर्जाचे गुळ असा एकूण 74 हजार 340 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला त्यावरून इसम नामे 1) बाबुराव ज्ञानोबा ढमाले, राहणार महापूर जिल्हा लातूर (फरार) याचे विरुद्ध पोलीस ठाणे रेणापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे
अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे सूचना व मार्गदर्शनात लातूर पोलिसा कडून अवैध धंद्याविरुद्ध जोरदार कारवाई करण्यात येत असून सदरची कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, संजय कांबळे, राहुल कांबळे यांनी केली आहे.