कामगारा बरोबरच मजूरांचा प्रश्न निकाली काढावा
मुंबई (दै.लातूर प्रभात प्र.)ः कोरोना कोविडच्या फैलावामुळे कारखानदारी उद्योग व्यवसाय बंद पडल्याने कामगार मजूरांची उपासमार होत गेली. अनेकजनानी गाव गाठले. जे आहेत त्यांची सोय म्हणून कारखानदार कामगार संघटना शासकीय कामगार अधिकारी आरोग्य अधिकारी कार्यालयाने समारोपातून निर्णय घेवून कामगाराना पाळीने काम देणे, व वेळे पेक्षा जास्त काम केल्यास त्यावेळेचा दाम दुप्पट असा मोबदला द्यावा असे निर्णय घेवून अधिकृत कामगारांचा प्रश्न सांमजशाने सोडविल्याची माहिती अधिकृत सुत्रानी दिली. त्यामूळे कामगारांचा प्रश्न तात्पुरता मिटला असला तरी असंघटीत कामगार व मजूरांचा प्रश्न टांगणीलाच असल्याने तोही विनाविलंब निकाली काढावा अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे.
कारखानदार मील चालक औद्योगीत उद्योग क्षेत्रातील उद्योजकानी कामगारा बरोबरच असंघटीत कामगारांचे प्रश्न ऐरणीवर असून त्या संदर्भात शासकीय पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अहवाला प्रमाणे जिल्हा स्तरावर शक्य त्या ठिकाणी पाझर तलाव, मनरेगाची कामे, जलसिंचनाची कामे काढून मजूरांचा ही प्रश्न निकाली काढावा अशी मागणी राज्यातील असंघटीत कामगार संघटनाकडून होताना दिसत आहे. विशेष म्हणजे कामगारा प्रमाणेच रोजी काम त्यातील मजूरी आणि आगाउ काम केल्यास त्याचाही अधिकचा मोबदला देण्याची तरतूद करावी अशी मागणी मजूरातून होत असताना दिसते आहे.
राजकारण चालविण्यासाठी जशी सर्वसामान्य नागरीक कामगार मजूर व सर्वसामान्य जनतेची गरज असते, त्यांना वेळोवेळी हात वर करुन पांठिबा दर्शविणेसाठी विनंती केली जाते, त्याच पध्दतीने सामाजीक जाणीवेतून शेत मजूर मजूर कामगारांना न्याय व हक्क देण्यासाठी लोकप्रतिनिधीनी हातवर करुन शासनास मजूरांच्या प्रश्नासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही व्यक्त होताना दिसते आहे.