संपादकीय...

महाराष्ट्र दिना नंतर ...


महाराष्ट्र दिन कोरोना प्रार्दूभावाच्या सावटात साजरा झाला. साठ वर्ष पर्यंतचा काळ आणि आजपर्यंतचा चाकाचोळा सर्वकांही वृत्तपत्रातून केला गेला.  कोरोना कोविडच्या विषारी संसर्गजन्य रोगाच्या संक्रमनाच्या भितीपोटी केवळ जिल्हास्तरावर एकाच ठिकाणी ध्वजरोहन करुन महाराष्ट्र दिनाचे स्मरण व स्वागत करण्यात आले.  सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्षातील अनेक लोकप्रतिनिधीना महाराष्ट्र दिन कशासाठी साजरा केला जातोय, त्यामागचा इतिहास आंदोलने माहित नसतील किंवा असतील, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लढ्यात १०७ लढवयांचे बलिदान गेले, त्यांची नांवेही माहित असतील नसतील किंवा किमान महाराष्ट्र दिनी तरी त्या बलिदान कर्त्याचे स्मरण करुन त्या अभिवादन करणे, हि कोणाच्या ध्यानी मनी नसावे असा हा महाराष्ट्र दिन आपण नेहमीप्रमाणे साजरा करीत असतो.  आणि आज केला. 
 लोकशाही प्रणालीनुसार महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हास्तरावर पालक मंत्री महाराष्ट्र दिनाचे औचित्यसाधून ध्वजरोहन करीत असतात.  महाराष्ट्राची आजवरची प्रगती व उद्याच्या प्रगती व विकासा संदर्भातील ठरावीक ठोकताळे भाषणातून संागत असतात.  पण या महाराष्ट्र दिनी मंत्री महोदयाची संधी हुकली, आणि ध्वजारोहना नंतरच्या स्नेहभोजन बैठकीत मी असे केले, तसे केले, किंवा विरोधकाना कसे फटकारले, आणि रात्रीच्या वेळी एकत्र कसे बसलो.  याची रंगीत तालीम यावेळी देणे राहून गेले.  आणि कोरोना कोविडचा पाडाव करणे पाहिजे म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपला जिल्हा कोरोना मुक्त झाला पाहिजे एवढेच सांगून मनोगत संपवून उद्याच्या महाराष्ट्राचे काय ते मुख्यमंत्री बघुन घेतील ज्यास्त कशाला बोलावे म्हणून त्यांनी त्यांनी आपापले घर जवळ केले असावे अशीच चर्चा होताना दिसते आहे. 
 महाराष्ट्र दिना निमित्ताने शरद पवार यांचेसह अनेक महाराष्ट्रायीन नेत्यांनी महाराष्ट्र संयुक्त चळवळीतील अनुभव किंवा त्यातील दाहकतेसह आत्मीयता आणि महाराष्ट्राची जडणघडण या बद्दल मुलाखतीतून आपापले मत व्यक्त केले.  आणि उद्याच्या महाराष्ट्र दिनीच्या संकल्पा मांडून विकासात्मक आपेक्षा व्यक्त केली.  पंरतू महाराष्ट्र दिना पेक्षा सर्वच वृत्तपत्रातून उध्दव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद, त्यांची विधान परिषदेतील निवडणुकीचा अंदाज यावरच अनेक वृत्तपत्राची रकाने व्यापून निघाली होती. पंरतू महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आजपर्यतचा इतिहास आणि उद्यासाठीचे योग्य धोरणात्मक निर्णय याबद्दल चर्चा पुरेपूर होवू शकली नाही.  यातून उद्याचे नागरीक व नेहमीच्या वाचकाची निराशाच झाली असावी असेच सर्वत्र दिसते आहे. 
 महाराष्ट्रासमोर आजघडीला विकासात्मक प्रश्‍नाबरोबरच वाढती महागाई, बेरोजगारी, नौकर भरती, भ्रष्टाचार निर्मूलन, जातधर्माची घुसखोरी, जातीयवाद धर्मवादातून होणार्‍या विघटनवादी घटना, दलित मुस्लिमावरील वाढते अन्यय अत्याचार अशा अनेक बाबीने धर्मनिरपेक्ष पुरोगामी लोकशाहीवादी महाराष्ट्राला पोखरुन टाकले आहे.  तरी ही इतर राज्या पेक्षा महाराष्ट्र संयमी शिस्तप्रिय दिसतो.  याचा सर्वकष विचारकरुन सत्ताधारी लोकप्रतिनिधीनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाठी तत्पर राहून आम नागरीकांच्या समस्या सोडविल्या पाहिजेत, अशी लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे. 
 स्पर्धात्मक युगात बदलत्या काळानुसार वैज्ञानीक शिक्षण, वैद्यकीय शिक्षणासह तंत्रज्ञान, अण्वस्त्र शिक्षण, जल सिंचन, बांधकाम वगैरे बाबतीत सुधारणा व धोरणात्मक शिक्षणाचा प्रचार व प्रसार करुन तसी अमलबजावणी करणे जरुरीचे आहे.  त्यातच महागाई, बेकारी, भ्रष्टाचार व अन्याय अत्याचाराचे निर्मूलन करणे गरजेचे असून त्यासाठी निर्णाय कृति वृत्ती करणे महत्वाचे ठरते.  म्हणूनच शासकीय सत्ताधारी यंत्रणा प्रमाणीक कार्यरत राहणे ही काळाजी गरज आहे.  अशी लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे. 
 विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाने गेल्या दहा पंधरा वर्षातील अनेक प्रकल्प रखडून ठेवलेले आहेत.  काल पर्यंतच्या सरकारने ही मागील सरकारचीच री ओढलेली असून कॉग्रेस राजवटीच्याकाळात कोकणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ निर्माण केले गेले.  त्या विद्यापीठाची आजघडीला काय अवस्था आहे, सारे कांही नावालाच असल्याची चर्चा होताना दिसते.  यातच मागील सरकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक इंदू मिलच्या परिसरातील विस्तारीत इमारतीचे कार्य अर्धवटच आहे.  त्यात नविनच वेगवेगळे प्रकल्प वाढवून ठेवले आहेत.  आजचे महाआघाडीचे सरकार ते पूर्णत्वास नेईल कि नाही, या बद्दल खलबते उडताना दिसत आहेत.  कांही असले तरी योग्य ते सर्व पूर्णत्वास नेने गरजेचे आहे असे वाटते.  
 महाराष्ट्रात शिक्षण, उद्योग व्यापार, कृषी क्षेत्र, जल सिंचन, विज्ञान तंत्राज्ञानासह रोजगार निर्मिती व प्रकल्प उभारणे गरजेचे आहे.  आहेत त्या शैक्षणीक संस्था मधून बदलत्या प्रवाहनुसार शिक्षण दिले पाहिजे.  केवळ उत्पानाचे साधन म्हणून किंवा भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून शासकीय खाजगी शिक्षणाकडे पाहू नये, त्यात पारदर्शकता असावी आणि आणावी अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसते आहे.  आधुनिक भारतासह महाराष्ट्रातही कलयुगाचे वारे वाहताना दिसते आहे.  ते घडू नये अशीच लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे.  अन्यथा सुप्रसिध्द गायक प्रल्हाद शिंदे याच्या म्हणण्यानुसार कली युगाची झाली भेळ, लावली रताळ, आली केळ, अशी वेळ येवू नये अशीच धास्ती सर्वसामान्य जनतेत व्यक्त होताना दिसते आहे. 
 उद्याचा महाराष्ट्र उज्वल, विकसीत वैभवशाली बनावा आणि महापुरुषाणी घालून दिलेल्या आदर्शाची कृतीवृत्तीची जोपासणा व्हावा, आजघडीला जसे मुंबई महाराष्ट्राकडे दिल्लीचे लक्ष लागून राहते, तसेच लक्ष सार्‍या जगाचे मुंबई महाराष्ट्राकडे लागून असावे अशी कृती धोरणाची अमलबजावणी व्हावी असे महाराष्ट्र दिनाच्या साठाव्या वर्धापन दिनाच्या अभिवादना नंतरच्या दिवसापासून आपण सारे महाराष्ट्रीय वैभवशाली परंपरेसाठी एकत्रित पणे विकासात्मक न्यायीक लढ्यासाठी पुढे येवू या असा संकल्प करुन मार्गक्रमन करावे हीच खरी महाराष्ट्र व महाराष्ट्र निर्मिती दिनाची शान व मान राहिल यात शंका नसावी. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या