लातूरातील जीर्ण-दुभंगलेल्या इमारती पडण्याचा धोका
लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः समाधानकारक पावसामूळे शेतकरी सुखावत असला तरी शहरी भागातील जून्या जीर्ण इमारती आणी दुरुस्ती केल्यामूळे दुभंगलेल्या इमारती अतिवृष्टीमूळे पडण्याचा धोका लक्षात घेवून जिल्हा प्रशासनासह मनपा प्रशासनानेही लक्ष घालून जीर्ण झालेल्या इमारती रिकाम्या कराव्यात आणी परवानगी विना दुरुस्ती केल्याने दुभंगलेल्या इमारतीला तडे जात असल्याने संबधीतावर कारवाई करुन प्राणहाणी होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी लोकभावना व्यक्त होताना दिसते आहे.
गावभागातील घरे, इमारती जीर्ण झालेल्या आहेत. मागासभागात कच्ची घरे आहेत अशाना अतिवृष्टीचा धोका पोंहचू नये यासाठी उपायायोजना कराव्यात अशी ही मागणी होताना दिसते आहे. दै. लातूर प्रभाच्या प्रतिनिधीने शहरी व गावभागात फेरफटका मारल्यानंतर तसे निदर्शनास आले असून जिल्हा व मनपा प्रशासनाने त्वरीत दख्खल घेवून निवारण करावे असे लोक बोलत असताना दिसतात.
विशेष म्हणजे लातूर महानगर पालीकेच्या मालकीच्या गांधी चौकातील दुकाने भाडेकरुनी महानगर पालिकेची परवानगी न घेताच छत पाडून तळमजल्यावरच दोन मजले बनविले आहेत. तर दुकानातील कांही भितीचा भाग पाडून कार्यालय व चेंबर निर्माण केल्याने भितीसह दुकानावरील छत कमकूवत केला गेला असल्याने लातूर महानगर पालिकेच्या मालकीच्या गाळेवास्तूचे नुकसान झाले असून अनेकानी रिकाम्या जागेवर अतिक्रमण करुन तिथे कार्यालये व दुकाने थाटली असल्याने मनपा वास्तूचे नुकसान झाले असून अशी दुकाने, कार्यालयीन बांधकाम वास्तू अतीवृष्टीमूळे कधीही ढासळू शकते यासाठी विनापरवाना दुकानाची दुरुस्ती बांधकाम केलेल्या भाडेकरुवर कारवाई करुन दंड वसूल करावा आणी अतिवृष्टीमूळे प्राणहाणी होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करुन नागरीकाना न्याय द्यावा अशी या परिसरातील नागरीकातून होताना दिसते आहे.