घरात भुकेची तर घराबाहेर टाळेबंदीची चिंता

घरात भुकेची तर घराबाहेर टाळेबंदीची चिंता 


लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना कोविड रोगाची सर्वानाच भिती आहे.  कोविडबाधीताना योग्य औषधी उपचार होत नाहीत.  दरोजच कोरोना-कोविडग्रस्ताची संख्या वाढते आहे पण आम्हाला रोजगार नसल्याने कुटूंबाची गुजरान कशी करावी यांची भ्रांत आहे.  पण कोविड रोगाची भिती नाही आम्हाला घरात भुकेची तर घराबाहेर टाळेबंदीची चिंता असल्याची लातूरातील कामगार, मजूर, गोरगरीब लोक बोलताना दिसत आहेत. 
 टाळेबंदी शिथील झाल्याने अधून-मधून हाताला काम मिळत होते, कशीबशी गुजरान होत होती पण पून्हा टाळेबंदी लागू झाल्याने कोरोना-कोविड हटत नाही आणी टाळेबंदी उठत नाही यातून जगणेच कठीण होवून बसले असून घरात भुकेची तरी घराबाहेर टाळेबंदीची चिंता असल्याची आर्त हाक लातूर शहरातील गोरगरीब, असंघटीत कामगार, मजूरातून प्रकट होताना दिसते आहे. 
 मागासवस्तीतील घरासमोर थांबलेल्या कांही कामगार, मजूराना रोजी कामाविषयी आणी घर संसाराबद्दल दै.लातूर प्रभातच्या प्रतिनिधीने विचारपूस केली त्यावेळी मागील टाळेबंदीत उसने, पासने, कर्जबाजारी होवून कसेबसे घर भागविले पण आजघडीला कोणी देत नाही काम नाही टाळेबंदीत बाहेर जाता येत नाही कामबंद, चूलबंद अशीच विकट अवस्था निर्माण झाल्याचे सांगीतल्याने कामगार, मजूराना भुक-भुक म्हणून मरण जवळ करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे चित्र दिसते आहे. 


वैशिष्ट्यीकृत बातम्या

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

              लातूर प्रतिनिधी : ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजू र सर्वांनी मिळू...

लोकप्रिय बातम्या