लातूर प्रशासनाने धारावी पॅटर्न राबवावा
लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः महाराष्ट्राला कोरोना कोविडने ग्रासले आहे त्यात लातूर शहर व जिल्हाभरात कोरोना-कोविडग्रस्ताची संख्या वाढते आहे त्यामूळे स्थानीक लोकप्रतिनिधीशी चर्चा करुन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यानी पंधरा दिवसासाठी पून्हा टाळेबंदी लागू केली आहे. पंरतू केवळ टाळेबंदी लागू केल्याने कोरोना-कोविड रोगाचे निर्मूलन होणार नाही तर त्यासाठी औषधी उपचारासह लातूर प्रशासनाने धारावी पॅटर्न राबवावा अशी अपेक्षा आमजनतेतून व्यक्त होताना दिसते आहे.
मुंबईतील धारावी झोपडपट्टी ही जगातली सर्वात मोठी आहे सुमारे दहालाख लोकवस्ती असलेल्या धारावीत लोक दाटीवाटीतच राहातात. कसल्याच सुविधा नाहीत, कोविडची लागण झाली तेंव्हा तत्कालीन आयूक्त प्रविणसिंह परदेशी यानी दुर्लक्ष केले असल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी धारावीशी ओळख असलेले इकबालसिंग चहल याना आयूक्त म्हणून नियूक्ती केली चहल यानी खूर्चीत बसून आदेश न देता स्वतः धारावी झोपडपट्टीची पाहनी केले त्यांच्यात मिसळले आणी सर्व सुविधासह औषधी उपचार सुरु केले. सुनियोजीत प्रशासकीय यंत्रणा राबविली तीच धारावी आज कोरोना मूक्त बनली आहे. तोच पॅटर्न राबवून लातूरसह लातूर जिल्हा कोरोना कोविड भयमूक्त करुन सर्वसामान्याना न्याय द्यावा अशी मागणी सर्वसामान्य लोकातून होताना दिसते आहे.