संपादकीय...
माणसापरिस टाळेबंदी बरी
सत्ताहीन गुलाम सारे, मानव भक्त सत्तेचा
सत्ता नसे माणसाला, तर तो गुलामासारखा
म्हणून सत्तेसाठी वाटेल ते करुन सत्ता हस्तगत करायचीच हे एक लोकशाही प्रधान देशाचे सुत्रच बनल्याचे दिसते आहे. अनेक राज्यातील राजकीय घडामोडीवरुन असेच दिसते. महाराष्ट्रातही तिन पक्षाच्या आघाडीचे सरकार आहे कारण भाजपाला सरकार बनवू द्यायचे नाही हेच होते. आणी साधा नगरसेवकही न बनलेले शिवसेनेचे उध्दव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाले.
मुख्यमंत्री पदाच्या घोड्यावर स्वार होवून दौड करण्यापूर्वीच तीन पक्षाच्या आघाडी सरकारला कोरोना कोविड १९ या विषारी विषाणूच्या संसर्ग रोगाने घेरले आणी सरकारी वादळापूर्वीच कोविड संकटाच्या चक्रव्यूहात ठाकरे सरकार गुरफटले गेले आणी शिवसेनेच्या सभा गाजविल्याप्रमाणे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी मातोश्रीवरुन तर कधी सह्याद्रीतून कारभार हाकण्यास सुरुवात केली कारभार कसा करावा हा मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे याना जसा अधिकार आहे तसाच जनतेलाही जाब विचारण्याचा हक्क आहे हे ही विसरुन चालणार नाही अशी ही चर्चा होताना दिसते आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शासकीय-प्रशासकीय कामकाजात नवीन असल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे व शिवसेनेतील अनुभवी असलेले लोकप्रतिनिधी, मंत्री जमवून घेताना दिसत आहेत. आजघडीला आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षाच्या मंत्री-आमदाराशी समन्वय साधून काम करावे लागते तर केंद्र सरकारशी समन्वयातूनच जुळवून घ्यावे लागते तसे केंद्र सरकारही साथ देताना दिसते आहे त्याचा प्रत्यय विधान परिषद सदस्य निवडीतून आला त्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यानीही साथ दिली. विरोधी पक्षनेतेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याना अडचण निर्माण करीत नाहीत पंरतू माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते राज्यभर जनतेत मिसळून कोरोना कोविडची माहिती घेत आहेत. मदत करीत आहेत कोविड बाधीताना धीर देताना दिसतात तस मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हातून होताना दिसत नाही असे सर्वत्र बोलले जात आहे.
महाराष्ट्रात कोरोना कोविडचे कहर केला आहे. औषधी-लसच्या अभावामूळे योग्य उपचार होत नसले तरी आरोग्य विभागाच्या न्यायीक उपचार व प्रयत्नामूळ रुग्ण बरे होत आहेत. ज्याना विविध आजारानी ग्रासलेले आहे ते दगावत असले तरी वैद्यकीय सेवेत ढिलाई दिसत नाही आहे त्या औषधीवर डॉक्टरी ताफा कोरोना कोविड निर्मूलनाची लढाई जिंकताना दिसते आह हे नाकारुन चालणार नाही हे वास्तव असावे अशी चर्चा होताना दिसते आहे.
कोरोना कोविड निर्मूलनासाठी मार्चपासून टाळेबंदी आहे, सर्वसामान्य जनता भरडून निघत आहे. कोविड संसर्गाच्या मगरमिठ्ठीतून बाहेर पडू पाहते आहे. कांही दिवस टाळेबंदी शिथील झाली तेंव्हा कसेबसे जनजीवन पूर्वपदावर येत होते तोच पून्हा टाळेबंदीचा वटहुकूम लोकभावना नसतानाही जनतेच्या माथी मारण्यात आला ही बाब अन्याय कारकच म्हणावी लागेल यात संदेह नसावा अशीच चर्चा आमजनतेत होताना दिसते आहे.
कोरोना कोविड निर्मूलनावर एक जालीम उपाय म्हणजे औषधी लस आणी वैद्यकीय उपचार हेच असताना केंद्र किंवा राज्य सरकारकडे कोरोना कोविड विरोधी औषधी लस उपलब्ध नसल्यानेच माणसं कोंडून-भूकबळी झाले तरी चालतील पण कोविडमूळे प्राण हानी झाली म्हणून लोकप्रतिनिधीसह आमजनतेने सरकारवर खापर फोडू नये सरकार पायउतार होण्याची वेळ येवू नये यासाठी केंद्र सरकारसह भाजपाशासीत राज्य आणी महाराष्ट्र सरकारला-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याना मनोमन वाटत असावे म्हणूनच कोरोना काविड निर्मूलनासाठी माणसं गेलीतरी चालतील पण सरकार टीकले पाहिजे, उशिरा का होईना कोविड निर्मूलन झाले पाहिजे यातच सरकार यश असावे अशी सरकारची खात्री असावी म्हणूनच माणसापरिस टाळेबंदी बरी म्हणून पून्हा एकदा सरकारने टाळेबंदी लागू केली असावी अशी आमजनतेतून संतापजनक चर्चा होताना दिसते आहे. ही वास्तववादी चर्चा नाकारुन चालणार नाही असे राजकीय वर्तूळात बोलले जाते आहे. मतदारानी मते देवून लोकप्रतिनिधी निवडले त्यानी सरकार बनविले पण लोकानी, लोकासाठी, लोकातून चालविले जाणारे सरकार हेच लोकशाहीचे प्रतीक असते पण सरकारचा मुखियाच लोकाना डांबून टाळेबंदीला जवळ करीत असेल तर माणसापरिस टाळेबंदीच बरी हेच सरकारचे धोरण असावे अशी चर्चा होताना दिसते आहे.