लातूरात लॉकडाउनची कुणकूण लागताच देशीदारुला उसळी
लातूर (दै.लातूर प्रभात प्र.) ः कोरोना-कोविडची वाढती संख्या लक्षात येताच पालकमंत्री व जिल्हाधिकारी लातूर यांनी पंधरा दिवसाचा लॉकडाउन जारी करण्याची कुणकूण लागताच देशी दारुची काळ्या बाजारात विक्री करणार्यानी अवैद्य देशीदारु विक्रीसाठी भरमसाठ दारु खरेदी करुन काल ती दुप्पटभावाने विक्री करत असल्याची चर्चा मद्दपीत होत असून अवैद्य देशी दारु विक्रीने उसळी घेतली असून मद्दपीचा लोंढा अवैद्य देशी दारु विक्रेत्याकडे जात असल्याचे चित्र दिसते आहे.
कोरोना कोविड बांधीताची संख्या वाढत असल्याने अधीक फैलाव होऊ नये यासाठी पालकमंत्री अमित देशमूख आणी जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी टाळेबंदीचा निर्णय घेताच सदरील बातमी वार्यासारखी लातूरात पसरली आणी अवैद्य दारु विक्रेत्यानी देशीदारुचा साठा करुन कालपासून दुप्पटभावाने मद्दविक्री करीत असले तरी संबंधीत पोलीस ठाण्यातील अधिकारी अवैद्य देशीदारु विक्रेत्याना पाठीशी घालत असल्याने पोलीसाना चिरिमिरी तर मद्दपीना दारु आणी विक्रेत्याना मलिदा अशी चंगळ होताना दिसते आहे.